Corona Vaccination : अलिबाग शहरातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 06:16 PM2021-05-19T18:16:12+5:302021-05-19T18:16:59+5:30

Corona Vaccination : सध्या ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. कोविन अॅप वरुन नोंदणी करणाऱ्यांना लसीचा डोस देण्यात येत आहे.

Corona Vaccination: Independent vaccination center for citizens of Alibag city | Corona Vaccination : अलिबाग शहरातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र

Corona Vaccination : अलिबाग शहरातील नागरिकांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र

Next
ठळक मुद्देअलिबाग नगर पालिकेने एक स्वतंत्र डिजिटल ऑनलाईन फॉर्म तयार केला आहे, या माध्मातून नागरिकांना घरबसल्या लसीकरणासाठी पूर्व नोंदणी करता येणार आहे.

रायगड : अलिबागकरकारांना आता लसीकरणासाठी तात्कळत बसण्याची गरज राहणार नाही. शहरात सार्वजनिक वाचनालयामध्ये ४५ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी लोकमतशी बोलताना दिली.

सध्या ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. कोविन अॅप वरुन नोंदणी करणाऱ्यांना लसीचा डोस देण्यात येत आहे. मात्र सदरच्या अॅपवरुन ऑनलाईन नोंदणीमध्ये काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रावरुन रिकाम्या हाताने परत फिरावे लागत आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यात येत असल्याने शेजारील जिल्ह्यातील नागरिकही लसीकरणासाठी गर्दी करतात. मात्र या पुढे नागरिकांची मनस्तापातून सुटका होणार आहे. अलिबाग नगर पालिकेने एक स्वतंत्र डिजिटल ऑनलाईन फॉर्म तयार केला आहे, या माध्मातून नागरिकांना घरबसल्या लसीकरणासाठी पूर्व नोंदणी करता येणार आहे. 

दिवसाला किमान ३०० नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. जेवढ्या लस जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त होतील. तेवढ्याच नागरिकांना नगर पालिकेतून काॅल जाईल. तेवढ्याच नागरिकांना ठराविक वेळेत लस टोचली जाईल. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे शिवाय अनावश्यक गर्दी टाळता येणार आहे, असे नाईक यांनी सांगितले. ज्यांना ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही, त्यांची नोंदणी लसीकरण केंद्रावर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अलिबाग शहरातील सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालयाच्या डोंगरे हॉलमध्ये लसीकरण केंद्र सुरु होत आहे. सकाळी १० ते ते सायंकाळी ५ या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. नागरीकांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले आहे.

Web Title: Corona Vaccination: Independent vaccination center for citizens of Alibag city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.