Corona Vaccination: काेराेना लसींचा साठा संपला; 50 लसीकरण केंद्रे बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 12:17 AM2021-04-08T00:17:12+5:302021-04-08T00:17:33+5:30

जिल्ह्यात महाविस्फाेट हाेण्याची शक्यता; नागरिकांनी सतर्क राहावे

Corona Vaccination Corona vaccine stock finished 50 vaccination centers closed | Corona Vaccination: काेराेना लसींचा साठा संपला; 50 लसीकरण केंद्रे बंद

Corona Vaccination: काेराेना लसींचा साठा संपला; 50 लसीकरण केंद्रे बंद

Next

- आविष्कार देसाई

रायगड : जिल्ह्यातील काेराेना लसीचा साठा संपल्याने ८० पैकी ५० लसीकरण केंद्रांना टाळे लागले आहे. पुढील दाेन दिवसांमध्ये लस उपलब्ध झाली नाहीतर अखंड जिल्ह्यातील काेराेना लसीकरण ठप्प पडणार असल्याचे चित्र आहे. काेराेनाचा आकडा सातत्याने वाढत असताना दुसरीकडे मात्र लस उपलब्ध हाेत नसल्याने जिल्ह्यात काेराेनाचा महाविस्फाेट हाेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात काेराेनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डाेके वर काढले आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. वाढत्या काेराेनाला आळा घालण्यासाठी देशभरातील नागरिकांसाठी केंद्र सरकारने लसीकरण सुरू केले आहे. केंद्र सरकारकडूनच राज्य सरकारांना मागणीनुसार लसींचा पुरवठा केला जाताे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये ८० लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले. त्या लसीकरण सेंटरमार्फत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १५ हजार ३५८ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ३५ हजार ६७० आराेग्यसेवक आणि फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात आली आहे. तसेच ४५ वर्षांच्या पुढे असणारे २३ हजार ९५७ नागरिक आहेत. ५५ हजार ७३१ ज्येष्ठ नागरिकांनीही लस घेतली आहे. जिल्ह्याला सुमारे एक लाख ३० हजार काेविशिल्ड आणि काेव्हॅक्सिन लसी प्राप्त झाल्या हाेत्या. राज्य सरकारने पाठवलेल्या लसींचा साठा संपत चालला आहे. लसी अपुऱ्या असल्याने ८० पैकी ५०हून अधिक लसीकरण सेंटर बंद झाली आहेत, तसेच पुढील दाेन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे. राज्य सरकारकडे दीड लाख लसींची मागणी करण्यात आली आहे. मात्र दाेन दिवसांत ती उपलब्ध झाली नाही तर लसीकरण पूर्णतः थांबणार आहे. नागरिकांची इच्छा असूनही त्यांना लस घेता येणार नाही.

केंद्र सरकारकडून राज्य सरकारला लसींचा पुरवठा हाेता. राज्य सरकारकडे जिल्ह्याची मागणी नाेंदवण्यात आलेली आहे. मात्र राज्य सरकारकडेच केंद्र सरकारने लसींचा पुरवठा केलेला नाही, अशी खरी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे काही ठिकाणचे लसीकरण थांबले आहे. तसेच पुढील दाेन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याने अन्य ठिकाणचेही लसीकरण बंद करावे लागणार आहे. लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण सुरू करण्यात येईल.
- निधी चाैधरी, जिल्हाधिकारी, रायगड

मुरूड ग्रामीण रुग्णालयातील लसीचा पुरवठा संपला
आगरदांडा : मुरूड ग्रामीण रुग्णालयात ७ मार्चपासून ६० वर्षांवरील आणि १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्यास सुरुवात केल्याने लस घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, तसेच वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळेही भीतीपोटी अनेक जण पुढे होऊन लस घेण्यासाठी येत आहेत. आतापर्यंत मुरूड ग्रामीण रुग्णालयात ८१९ नागरिकांना लस देण्यात आली. कोरोनाची रुग्णसंख्या रोखायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल, असे मुरूडचे तहसीलदार गमन गावित यांनी सांगितले. या अंनुषगाने तालुक्यातील नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात जात आहेत; परंतु बुधवारी लसीचा पुरवठा संपल्याने आलेल्या अनेक नागरिकांना लस न घेताच परतावे लागले.

कोरोना लसीचा पुरवठा संपल्याबाबत डाॅक्टर दिव्या सोनम यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की कालच आम्ही जिल्हा रुग्णालयात कोरोना लसीचा पुरवठा संपल्याचे कळवलं होते, तसेच आम्हाला लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती; परंतु तिथेही लसीचा तुटवडा असल्याने आम्हाला लस मिळू शकली नाही; परंतु प्राथमिक केंद्र मुरूड-बोर्ली येथे कोरोना लसीचे ५० डोस उपलब्ध आहेत. ते डोस आम्हाला उपलब्ध करून द्यावेत याकरिता आम्ही मागणी केली होती. दुपारपर्यंत आम्हाला लसीचे डोस मिळणार आहेत. तरी आलेल्या नागरिकांना लसीचा डोस देण्यात येईल; परंतु उर्वरित नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे. लस उपलब्ध होताच पुन्हा लसीकरणाला सुरुवात करण्यात येईल.
 

Web Title: Corona Vaccination Corona vaccine stock finished 50 vaccination centers closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.