शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

उरण, महाड विधानसभा मतदारसंघात आमदार निवडून आणण्याची कॉंग्रेसची गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 17:20 IST

उरण, महाड विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा आमदार निवडून आणण्याची गर्जना रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी गुरुवारी ( २२) उरण येथील जाहीर सभेतून केली आहे.

मधुकर ठाकूर -

उरण : उरण, महाड विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा आमदार निवडून आणण्याची गर्जना रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी गुरुवारी ( २२) उरण येथील जाहीर सभेतून केली आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनंतर, उरण-महाड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या आगामी निवडणुकीतही महाआघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे चित्र दिसू लागले आहे. 

 उरण तालुक्यात मागील निवडणुकीत काँग्रेसच्या हाताला फक्त एकच ग्रामपंचायत लागली होती.मात्र रविवारी (१८) तालुक्यातील  १८ ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने चांगलीच मुसंडी मारली आहे. तीन ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासह  सत्ताही काबीज केली आहे.पिरकोन ग्रामपंचायतीवर तर मागील ४० वर्षांपासून असलेली शेकापची सत्ता उलथून टाकली आहे. तर धुतुमच्या शेकापच्या सत्तेला सुरुंग लावून सत्ता काबीज केली आहे. 

तसेच १५१ ग्रामपंचायत सदस्यांपैकी २५ सदस्य कॉंग्रेसचे निवडून आणले आहेत.उरण तालुक्यातील कॉग्रेस पक्षाच्या विजयी झालेल्या सरपंच व सदस्यांचा सत्कार सोहळा गुरुवारी (२२) आयोजित करण्यात आला होता. उरण येथील एका हॉटेलमध्ये रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यास तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे,उरण तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा रेखा घरत,उरण शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, राजिप सदस्य बाजीराव परदेशी, माजी सदस्य डॉ.मनिष पाटील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी प्रास्ताविक करताना उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी पराभवाने निराश होऊ नका असा सल्ला देतानाच आता नवोदितांना संधी द्या,पक्षीय हेवेदावे विसरून जाण्याचे आवाहनही म्हात्रे यांनी केले.

 यावेळी मार्गदर्शन करताना रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी उरण, महाड विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा आमदार निवडून आणण्याची गर्जना केली.कॉग्रेसमधुनच गेलेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमुळे भाजपला सुज आली आहे.मात्र भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मानसन्मान मिळत नसल्यामुळे कॉंग्रेसचे भाजपमध्ये प्रवेश केलेले कॉंग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी घरवापसीसाठी प्रयत्नशील असल्याचा दावाही महेंद्र घरत यांनी केला. यावेळी ग्रामपंचायतींमध्ये विजयी झालेल्या कॉंग्रेस पक्षाच्या सरपंच, सदस्यांचा सत्कारही करण्यात आला. 

टॅग्स :congressकाँग्रेसRaigadरायगडBJPभाजपा