काँग्रेसला मिळालेले यश भविष्यासाठी ऊर्जा देणारे - प्रतिभाताई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 04:04 IST2018-12-27T04:04:41+5:302018-12-27T04:04:58+5:30

पाच राज्यात काँग्रेसला मिळालेले यश हे ऊर्जा देणारे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागा. पुढील काळ हा काँग्रेस पक्षाला उभारी देणारा आहे, असे मत भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी येथे व्यक्त केले.

Congress has given the power to the success of the future - Pratibhatai Patil | काँग्रेसला मिळालेले यश भविष्यासाठी ऊर्जा देणारे - प्रतिभाताई पाटील

काँग्रेसला मिळालेले यश भविष्यासाठी ऊर्जा देणारे - प्रतिभाताई पाटील

अलिबाग : पाच राज्यात काँग्रेसला मिळालेले यश हे ऊर्जा देणारे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागा. पुढील काळ हा काँग्रेस पक्षाला उभारी देणारा आहे, असे मत भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी येथे व्यक्त केले. पाटील या वैयक्तिक कामानिमित्त अलिबाग तालुक्यातील किहीम येथे आल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली.
काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर, अलिबाग तालुकाध्यक्ष योगेश मगर यांनी पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी रायगड जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी, ओबीसी सेलचे अध्यक्ष सुनील थळे, रायगड जिल्हा महिला अध्यक्ष अ‍ॅड.श्रध्दा ठाकूर, राजा ठाकूर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मिस टिन इंडिया २0१९ ची विजेती माजी आमदार मधुकरराव ठाकूर यांची नात अपूर्वा हिचे त्यांनी विशेष कौतुक केले व तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी मंगळवारी कुलाबा किल्ल्याला भेट दिली.

Web Title: Congress has given the power to the success of the future - Pratibhatai Patil