दमदाटी करणाऱ्याची तक्रार दाखल

By Admin | Updated: March 28, 2017 05:28 IST2017-03-28T05:28:13+5:302017-03-28T05:28:13+5:30

कोळीवाडा येथील विनयभंगाच्या पीडित महिलेला तक्र ार मागे घेण्यासाठी तालुक्यातील एका नामांकित पुढाऱ्याने

A complaint has been lodged against the person | दमदाटी करणाऱ्याची तक्रार दाखल

दमदाटी करणाऱ्याची तक्रार दाखल

म्हसळा : कोळीवाडा येथील विनयभंगाच्या पीडित महिलेला तक्र ार मागे घेण्यासाठी तालुक्यातील एका नामांकित पुढाऱ्याने दमदाटी केल्याची तक्र ार पीडित महिलेने म्हसळा पोलीस ठाण्यात केली आहे. म्हसळा तालुक्यातील मौजे मेंदडी कोळीवाडा येथे १६ मार्च रोजी सकाळी ८ वा.या महिलेचा विनयभंग करून तिला अश्लील शिवीगाळ करणाऱ्या आरोपीविरूद्ध म्हसळा पोलीस ठाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. यातील सर्व आरोपी हे एका राजकीय पक्षाशी संलग्न असल्याने तालुक्यातील एका नामांकित पुढाऱ्याला हाताशी धरून पीडित महिलेला विविध प्रकारे भीती दाखवून दमदाटी केली, मात्र या महिलेने दमदाटीला न जुमानता पोलीस ठाण्यात या पुढाऱ्याविरूद्ध तक्र ार दाखल केली आहे. (वार्ताहर)

Web Title: A complaint has been lodged against the person