शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पंचनामे करून तत्काळ भरपाई देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:10 IST

प्राजक्त तनपुरे यांचे प्रतिपादन : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची कार्यवाही लवकर पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंगळवारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आणि कोरोना संदर्भातील उपाययोजनांसंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आढावा बैठकीचे आयोजन केले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात सर्वात जास्त नुकसान विजेच्या खांबांचे झाले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत, तेथे नवीन खांब बसवून ती कामे तातडीने पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत करावा. तसेच दोन ते तीन दिवसांत पूर्ण एसटी लाइनचे काम पूर्ण करावे. या कामासाठी बाहेरून जेवढे उपलब्ध होईल तेवढे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.स्थानिक मजूर लावायचे असतील तसेच काही साधनसामग्री खरेदी करावयाची असेल त्यासाठी निधीची कमतरता भासू दिलीजाणार नाही, असेही तनपुरे यांनी सांगितले.या वेळी आमदार महेंद्र दळवी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्केपाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग आर.एस. मोरे, कार्यकारी अभियंता, महावितरण अलिबाग माणिकलाल तपासे, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर आदी उपस्थित होते.नागरिकांनी एकजुटीने परिस्थितीचा सामना केला पाहिजे : महावितरणच्या अधिकाऱ्यांनादेखील त्यांच्या अधिकारात या कामासाठी निधी खर्च करण्याचे अधिकार दिलेले आहेत. जेणेकरून काम करताना कुठली कमतरता पडू नये; परंतु एकंदरीत परिस्थिती पाहता सर्वांनी हातात हात घालून काम करण्याची ही वेळ असल्याचे स्पष्ट केले. कोरोनामुळे बाहेरचे मजूर यायला घाबरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ, नागरिकांनी एकजुटीने या सर्व परिस्थितीचा सामना केला पाहिजे. ज्या व्यक्तींच्या घरांची पडझड झाली आहे, झाडांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे; या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्यांना भरपाई देण्यात येईल.