शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

संतोष देशमुख प्रकरणी आरोपींवरील मोक्का काढू देणार नाही, जरांगे-पाटलांचा निर्धार; मुख्यमंत्र्यांवर आरोप

By राजेश भोस्तेकर | Updated: June 6, 2025 12:18 IST

२९ ऑगस्टला मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार- मनोज जरांगे पाटील

राजेश भोस्तेकर

अलिबाग : बीड मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येला व त्याच्या कुटुंबाला न्याय मिळू नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांनी किल्ले रायगडवर आल्यानंतर केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत २९ ऑगस्टला आरक्षण मिळवून देणार ते पुढील १०० वर्षे समाजबांधवांना उपयुक्त असेल असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत.    किल्ले रायगडवरील शिवराज्याभिषेक निमित्त मनोज जरांगे पाटील किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळी नतमस्तक होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी बोलताना संतोष देशमुख यांच्या हत्येसह आरोपी बाबत बोलताना कोणत्याही परिस्थितीमध्ये मोक्का काढून देणार नाही, असे सांगत देशमुख यांच्या कुटूंबाने सुद्धा न्याय मिळण्याची आग्रही भूमिका घ्यावी असे सांगितले.     मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचे सांगत आरक्षण कुणाच्या बापाची जहागिरी लागली नसल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. ऑगस्टमध्ये मुंबई लाखो मराठा बांधवांनी जमावे, आरक्षण घेऊनच दाखवतो, कोण देणार नाही, आरक्षण आरक्षण द्यावेच लागेल असे मत त्यांनी व्यक्त केले.  राज्यातील कारभार सुस्थितीत व भय मुक्त राहावे यासाठी आपण किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजीराजे यांना अभिवादन करण्यासाठी आलो असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSantosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरण