शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

खोपोली, खालापूरमध्ये मंडळांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:00 IST

नवरात्रोत्सवाची तयारी; परवानगींसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हेलपाटे

वावोशी : गणपती उत्सवानंतर येणारा सण म्हणजे नवरात्र उत्सव होय. दोन दिवसांवर आलेल्या या सणाची खालापूर तालुक्यासह खोपोली शहरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मंडळांना परवानगी घेण्यासाठी कर्जत येथे उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात हेलपाटे मारावे लागत असल्याने या वेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.नवरात्र उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने खोपोलीसह खालापुरातील नवरात्र उत्सव मंडळाची तयारी जोरदार सुरू झाली आहे. खोपोली शहरातील नवरात्र उत्सवासाठी जागा, वीजपुरवठा व पोलीस परवानगीसाठी मंडळाचे पदाधिकारी अर्ज करून संबंधित विभागाकडे परवानगी घेण्यासाठी धडपडताना दिसत आहेत.नवरात्र उत्सव हा तरुणाचा उत्सव असल्याने प्रचंड ऊर्जा व विविध पारंपरिक पोशाखाने नटलेल्या तरुण-तरुणी हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असतात. दांडियाची धूम या वेळी पाहावयास मिळते, तर लाइव्ह बेंजो किंवा धडाकेबाज डीजेचा दणदणाट हे या उत्सवाचे दुसरे आकर्षण असते, यासाठीची तयारी प्रत्येक ठिकाणी सुरू झाली आहे. खोपोली शहरात २० नवरात्र मंडळ कार्यरत आहेत, तर खालापूर तालुक्यात २४ मंडळ असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या मंडळांकडून नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.मागील वर्षापेक्षा या वर्षी देवी मूर्तींच्या किमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली असल्याने पाच फूट उंचीच्या मूर्तीची किंमत आठ ते दहा हजारांवर पोहोचल्याचे दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आकर्षक मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण, हमरापूर येथील मूर्तींच्या कारखान्यात वेगवेगळ्या आकाराच्या व मागणीनुसार मूर्तींची निर्मिती पूर्ण झाली असून, रंगरंगोटी व सजावटीसाठी कारागीर शेवटचा हाथ फिरवीत असल्याचे दृश्य दिसत आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री