चेन्नई एक्स्प्रेसचाही कर्जतकरांना ठेंगा
By Admin | Updated: May 10, 2017 00:18 IST2017-05-10T00:18:39+5:302017-05-10T00:18:39+5:30
रेल्वे प्रशासनाने साप्ताहिक वातानुकूलित अहमदाबाद - चेन्नई गाडी पनवेल मार्गे नवीन गाडी सोमवारपासून सुरू झाली आहे,

चेन्नई एक्स्प्रेसचाही कर्जतकरांना ठेंगा
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : रेल्वे प्रशासनाने साप्ताहिक वातानुकूलित अहमदाबाद - चेन्नई गाडी पनवेल मार्गे नवीन गाडी सोमवारपासून सुरू झाली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकात दिली आहे, परंतु या गाडीचा कर्जतला थांबा दिला नसल्याने कर्जतकरांना पुन्हा एकदा ठेंगा दाखविल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत.
गाडी नंबर २२९२० अहमदाबादहून दर सोमवारी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी चेन्नईला पोहचणार आहे. ही गाडी अहमदाबादहून ८ मे २०१७ पासून सुरू झाली आहे. ही गाडी अहमदाबादहून दर सोमवारी दुपारी ३.३० ला सुटून पनवेलला रात्री ११.३५ मिनिटांनी येणार असून कर्जतला साधारण रात्री १२.२० च्या सुमारास येणार आहे. तसेच ही गाडी चेन्नईहून (२२९१९) दर बुधवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी सुटणार आहे. मात्र दोन्ही वेळा ही गाडी कर्जतवरून जाणार असली तरी तिला थांबा देण्यात आला नाही. यामुळे कर्जतकरांना ही गाडी पकडण्यासाठी पनवेलला जावे लागणार आहे. या गाडीला एकूण १० थांबे दिले असून कर्जतला सुध्दा थांबा दिला पाहिजे होता. जर पनवेल मार्गे जाणाऱ्या - येणाऱ्या गाड्या कर्जतला अधिकृत थांबविण्यात येत नसतील तर निदान कर्जत-पनवेल शटल सेवा तरी सुरू केली पाहिजे जेणेकरून कर्जतकर पनवेलला जाऊन गाड्या पकडू शकतील असे मत प्रवासी संघटनेचे पंकज ओसवाल यांनी व्यक्त के ले.