झूम अ‍ॅपवरून केला हनुमान जन्मोत्सव साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 06:13 AM2020-04-09T06:13:37+5:302020-04-09T06:13:44+5:30

कराडे खुर्द येथील तरूणांची शक्कल : आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामस्थ आले एकत्र

Celebrates Hanuman jayanti Celebration with Zoom App | झूम अ‍ॅपवरून केला हनुमान जन्मोत्सव साजरा

झूम अ‍ॅपवरून केला हनुमान जन्मोत्सव साजरा

Next

मयूर तांबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : सध्या सर्वत्र कोरोना विषाणुने धूमाकूळ घातलेला दिसून येत आहे. त्यामुळे सारेच नागरिक भयभीत झालेले आहेत. ८ एप्रिल रोजीचा हनुमान जयंतीचा सोहळा देखील सगळीकडे रद्द करण्यात आला. अशा परिस्थितीत देखील एकमेकांशी संपर्क साधून झूम या अ‍ॅप वरून रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून साधारण १५ किलोमीटर दूर पाताळगंगा नदीकाठी वसलेल्या कराडे खुर्द, या गावी अनोख्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावर्षी पहिल्यांदाच अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला असल्याचे आशिष वैद्य यांनी सांगितले.
पनवेल तालुक्यातील गावगावात मोठ्या उत्साहात हनुमान जयंती दरवर्षी साजरी केली जाते. मंदिराला विद्युत रोषणाई करून गावाला जेवण दिले जाते. यावेळी पालखीला सारे नागरिक एकत्र येतात. मात्र या वर्षी कोरोना विषाणुच्या प्रादुभार्वामुळे सारे सण, उत्सव रद्द करण्यात आले आहेत. कोरोनामुळे कराडे खुर्द गावातील देखील संपूर्ण उत्सवच रद्द करण्याचा योग्य निर्णय घेण्यात आला.
या उत्सवाला गेल्या १३५ वर्षांची अखंड परंपरा आहे. प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी दोन महिने आधी ग्रामस्थांची या हनुमान जन्मोत्त्सवाच्या आयोजनासंदर्भात गांवात सभा घेतली होती. त्यानंतर महिन्याभरातच कोरोनाच्या संकटामुळे भारत हदरला. या विषाणूने जगभर पसरायला सुरूवात केली होती. या पाश्वभूमीवर १५ मार्च रोजी कराडे खुर्द येथील ग्रामस्थांनी गावात एक सभा घेऊन संपूर्ण उत्सवच रद्द करण्याचा निर्णय घेतला.
कराडे खुर्द येथील परंतु इतर गावात आणि मुंबई, ठाणे, पुणे अशा विविध ठिकाणी कामानिमित्त वास्तव्याला असलेल्या तरूण ग्रामस्थांनी एकमेकांशी संपर्क साधून झूम अ‍ॅपवरून हा उत्सव व्हर्च्युअल पध्दतीने साजरा करण्याचं ठरवलं. त्यासाठी एक ग्रुप बनवला आणि या अ‍ॅपच्या माध्यमातून मिटिंग साधून जो जिथं आहे त्यांनी तिथंच राहून या उत्सवात उत्साहानं सहभाग नोंदवला होता.
असा झाला सोहोळा
च्८ मार्च रोजी सकाळी ६ ते ७ या कालावधीत कीर्तन तर ७.३० ते ८.३० या दरम्यान आरती आणि भजन अशा कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद घेतला.
च्प्रत्यक्ष एकत्र न जमताही एकोप्याचा आनंद घेत आपलं ध्येय साध्य करता येतं हे
कराडे खुर्द येथील ग्रामस्थांनी आपल्या या उपक्रमातून दाखवून देत सर्वासमोर एक आदर्श
ठेवला आहे.

Web Title: Celebrates Hanuman jayanti Celebration with Zoom App

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.