मानांकनामुळे सीईटीपीची जबाबदारी वाढली

By Admin | Updated: February 23, 2016 02:09 IST2016-02-23T02:09:04+5:302016-02-23T02:09:04+5:30

महाड औद्योगिक क्षेत्रातील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची गुणवत्ता, आरोग्य, पर्यावरण व सुरक्षा नियोजन प्रणालीतील सुसूत्रतेमुळे मिळालेल्या आयएमएस या आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे

CATP's responsibilities increase due to the ranking | मानांकनामुळे सीईटीपीची जबाबदारी वाढली

मानांकनामुळे सीईटीपीची जबाबदारी वाढली

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची गुणवत्ता, आरोग्य, पर्यावरण व सुरक्षा नियोजन प्रणालीतील सुसूत्रतेमुळे मिळालेल्या आयएमएस या आंतरराष्ट्रीय मानांकनामुळे या प्रक्रिया केंद्राची तसेच येथील कारखानदारांची जबाबदारी आता वाढली आहे. यापुढेही या सीईटीपीने नियोजन प्रणालीचे सातत्य कायम ठेवावे, अशी अपेक्षा सीएमडी आयपीएस प्रा.लि.चे चेअरमन सुंदर कटारिया यांनी व्यक्त केली.
महाडच्या सामायिक सांडपाणी केंद्राला आयएमएस नामांकन प्रमाणपत्र सोमवारी प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित केलेल्या सोहळ््याप्रसंगी कटारिया बोलत होते. हे आंतरराष्ट्रीय मानांकन मिळविणारा महाडचा हा सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र देशातील दुसरा, तर महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प ठरला. हे अत्यंत अभिमानास्पद असल्याचेही कटारिया यांनी स्पष्ट करून केंद्राच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. या केंद्राच्या प्रणालीचे काम असेच कायम सुरू राहिले, तर हे प्रक्रिया केंद्र जागतिक स्तरावरही आदर्श ठरेल, असा विश्वास कटारिया यांनी व्यक्त केला.
एमएमए सीईटीपीचे अध्यक्ष एस. बी. पठारे यांनी महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांसह सर्वांनी घटकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळेच आपल्या सीईपीटीला आंतरराष्ट्रीय मानांकन मिळाल्याचा हा सुवर्णक्षण पाहायला मिळाला, असे सांगितले. या मानांकनामुळे महाड औद्योगिक क्षेत्राची आता नवी ओळख निर्माण झाली असून, सामाजिक बांधिलकीतूनच आपण व आपल्या सहकाऱ्यांनी केलेल्या सामायिक परिश्रमाचे हे यश असल्याचेही पठारे यांनी सांगितले. यावेळी एसएमएचे माजी अध्यक्ष सुरेश भोसले, तहसीलदार संदीप कदम, आॅडिटर सचिन बिरवाडकर, डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, जिते ग्रामपंचायत सरपंच संजय कचरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी एस. आर. औटी, डॉ. रमेश नाईक आदी उपस्थित होते.

Web Title: CATP's responsibilities increase due to the ranking