मालवाहू जहाजाची सिंगापूर पोर्टला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:25 IST2018-10-13T22:54:44+5:302018-10-13T23:25:47+5:30
उरण : पाकिस्तानहून जेएनपीटी अंतर्गत असलेल्या सिंगापूर पोर्टमध्ये कंटेनर घेऊन आलेल्या जहाजाने थेट जेट्टीलाच धडक दिली. धडक इतकी जबरदस्त ...

मालवाहू जहाजाची सिंगापूर पोर्टला धडक
उरण : पाकिस्तानहून जेएनपीटी अंतर्गत असलेल्या सिंगापूर पोर्टमध्ये कंटेनर घेऊन आलेल्या जहाजाने थेट जेट्टीलाच धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, बंदरावरील क्यूसी क्रे नच्या रेलपर्यंत जेट्टी दोन ते तीन मीटर फुटली असून, कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.
शनिवारी पाकिस्तानहून ३५०० हजार कंटेनर घेऊन आलेले जहाज उरण येथील सिंगापूर पोर्टमध्ये दाखल झाले होते. मालवाहू जहाज लँडिंग करीत असताना जहाजावरील पायलटचा ताबा सुटल्याने अवजड जहाज थेट सिंगापूर पोर्टच्या जेट्टीला जाऊन धडकले. धडकेत जेट्टीला सुमारे तीन मीटरपर्यंत भेगा गेल्या आहेत. त्याशिवाय क्यूसी क्रेन रेलमार्गाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने वेळीच जहाज थांबल्याने पुढील अनर्थ टळला आहे. मात्र, रेल मार्गाचे नुकसान झाल्याने सिंगापूर बंदरातील कंटेनर हाताळणीच्या कामावर मोठा परिणाम होणार आहे. जीवितहानी झाली नसल्याचे सांगत, या प्रकरणी पीएसए प्रशासन अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती बीएमसीटीचे एचआरए अवधूत सावंत यांनी दिली.