केळशीच्या समुद्रात गाडी बुडाली; स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा आणली किनाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2021 12:51 IST2021-01-10T12:47:53+5:302021-01-10T12:51:44+5:30
सूचना वारंवार देण्यात येऊनही पर्यटक बेदरकारपणे समुद्रकिनारी वाहने आणत आहेत. त्यामुळे अनेक वेळा अपघातासारख्या घटना घडत आहेत.

केळशीच्या समुद्रात गाडी बुडाली; स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा आणली किनाऱ्यावर
दापोली : तालुक्यातील केळशी समुद्राला अचानक आलेल्या भरतीने पर्यटकांची गाडी समुद्रात बुडाली. या वाहनांमध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. समुद्राला ओहटी लागताच वाळूत रुतलेल्या गाडीला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने किनाऱ्यावर ओढून आणण्यात आले.
समुद्र किनाऱ्यावर वाहने आणू नये , बीचवर गाडया चालवू नये , अशा सूचना वारंवार देण्यात येऊनही पर्यटक बेदरकारपणे समुद्रकिनारी वाहने आणत आहेत. त्यामुळे अनेक वेळा अपघातासारख्या घटना घडत आहेत. काही वेळा तर पर्यटकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.