एसडीआरएफच्या दोन टिमला तात्काळ पाचारण करा; आदिती तटकरे यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 15:34 IST2021-07-24T15:32:03+5:302021-07-24T15:34:07+5:30
गावातील रस्त्याच्यामध्येच दरड काेसळल्याने सुमारे 100 नागरिक गावात अडकून पडले असल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे.

एसडीआरएफच्या दोन टिमला तात्काळ पाचारण करा; आदिती तटकरे यांचे निर्देश
रायगड: जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात आंबेमाची येथे शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. गावातील रस्त्याच्यामध्येच दरड काेसळल्याने सुमारे 100 नागरिक गावात अडकून पडले असल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे.
एसडीआरएफच्या दोन टिमला तात्काळ पाचारण करण्याचे निर्देश पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार तेथील नागरीकांचे बचाव व मदत कार्य सुरू आहे. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.