शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

कोटामधून २७ विद्यार्थ्यांना घेऊन बस आज येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 05:02 IST

बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खारघर येथे बस येणार असल्याची माहिती रायगडचे अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी दिली.

आविष्कार देसाई अलिबाग : राजस्थान येथील कोटामध्ये राज्यातील हजारो विद्यार्थी लॉकडाउनमुळे अडकून पडले होते. त्या विद्यार्थ्यांना आपापल्या घरी परत यायचे होते. रायगड जिल्ह्यातील सुमारे २७ विद्यार्थ्यांना घेऊन एक बस मंगळवारी राजस्थानमधून सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास रवाना झाली आहे. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास खारघर येथे बस येणार असल्याची माहिती रायगडचे अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी दिली.लॉकडाउन जाहीर झाल्याने सर्वच विद्यार्थी तेथे अडकून पडले होते. अलिबागमधील श्रेया घरत ही विद्यार्थीनी २०१८ पासून रिझोनेन्स इनस्टीट्युटमध्ये आयआयटीसाठी तयारी करत आहे. कोरोनामुळे आम्ही सगळेच घाबरलो आहोत. घरच्यांपासून लांब असल्याने पालकांनाही चिंता आहे. मात्र आता आम्ही आमच्या घरी निघालो आहोत. त्यामुळे आनंद होत असल्याचे श्रेयाने सांगितले.सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अ‍ॅलेन साकार ग्राऊँडमधून बस निघाली आहे. राजस्थान सरकारच्या बस असल्या तरी त्याचे पैसे हे आपल्या सरकारने दिले आहेत. बसमध्ये एकूण २७ विद्यार्थी आणि पाच पालक आहेत. बसमध्ये बसण्याआधी सर्वांच्या आरोग्याची तपसणी करण्यात आली आहे, तसेच खारघरमध्ये आल्यावर देखील त्यांची तपासणी करण्यात येईल. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार त्यांना निरीक्षण कक्षात अथवा घरीच निरीक्षणाखाली १४ दिवस ठेवण्यात येणार आहे, असे शितोळे यांनी सांगितले.>पनवेल येथील १२, अलिबाग ४, पेण ३, खालापूर आणि कर्जत प्रत्येकी २ मुरुड, महाड, सानपाडा आणि लोणावळा प्रत्येकी १ असे एकूण २७ विद्यार्थी आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस