माणगाव : ताम्हिणी घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी आणि सायंकाळी दोन भीषण अपघात झाले. रायगड जिल्ह्यातील काशीद बीच येथे पर्यटनासाठी निघालेल्या खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ताम्हिणी घाटातील अवघड वळणावरील डोंगराला बस धडकली. सकाळी झालेल्या या अपघातात सुमारे ५० प्रवासी जखमी झाले, तर सायंकाळी कार दरीत कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
पुण्यातील भोसरी येथील सावन आय. बी. ऑटोव्हिंग प्रायव्हेट लिमिटेड (शिव महिंद्रा) शोरूममधील कर्मचारी शुक्रवारी दोन खासगी बसमधून रायगड जिल्ह्यातील काशीद बीच येथे पर्यटनासाठी निघाले होते. सकाळी ११ च्या सुमारास ताम्हिणी घाटातील कोंडेथर गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने घाटातील अवघड वळणावर ही बस डोंगराला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, बसची समोरील बाजू पूर्णपणे चक्काचूर झाली.
ड्रोनच्या मदतीने घेतला अपघातग्रस्त कारचा शोधकार अपघातात चालक बालाजीचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त गाडीचा चेंदामेंदा झाला होता. अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलिस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाली.
ड्रोनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेण्यात आला. नोव्हेंबरमध्ये याच ठिकाणी जीप दरीत कोसळून पुण्यातील सहा तरुणांचा मृत्यू झाला होता. पुन्हा तिथेच अपघात घडला. ताम्हिणी घाटात एक जानेवारीलाही तीन वाहनांचे अपघात झाले होते.
Web Summary : Two accidents occurred in Tamhini Ghat. A bus carrying tourists crashed into a hill, injuring 50. In a separate incident, a car plunged into a valley, killing the driver. Drone assisted in locating the car.
Web Summary : ताम्हिणी घाट में दो दुर्घटनाएँ हुईं। पर्यटकों को ले जा रही एक बस पहाड़ी से टकरा गई, जिसमें 50 लोग घायल हो गए। एक अन्य घटना में, एक कार घाटी में गिर गई, जिससे चालक की मौत हो गई। ड्रोन ने कार का पता लगाने में मदद की।