शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

खारभूमी विभाग कार्यालयात घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:09 AM

पेण येथील खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या दोन कार्यालयात मंगळवार १६ जानेवारीच्या मध्यरात्री २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास तिघा अज्ञात व्यक्तींनी घरफोडी केली.

अलिबाग : पेण येथील खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या दोन कार्यालयात मंगळवार १६ जानेवारीच्या मध्यरात्री २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास तिघा अज्ञात व्यक्तींनी घरफोडी केली. कार्यालयाच्या दरवाजाची कुलपे तोडून कार्यालयातील कपाटातील व तिजोरीतील शासकीय दस्तऐवज फाडून नष्ट करुन ते अस्ताव्यस्त फेकून नुकसान केले आहे. मात्र कार्यालयातील एकही वस्तू चोरट्यांनी चोरुन नेलेली नाही अशी माहिती पेण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. या घरफोडीप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या दोन कार्यालयातील घरफोडीप्रकरणी कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक भगवान गुंजाराम अहिरे यांनी पेण पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दाखल केली आहे. घरफोडीदरम्यान या तिघा चोरट्यांनी कार्यालयांच्या दरवाजांची कुलपे तोडून कार्यालयातील टेबलांच्या खणांतील कपाटांच्या चाव्या घेवून कपाटे उघडून त्यातील अनेक गोपनीय कागदपत्रे फाडून कार्यालयात सर्व फेकून दिल्याचे कनिष्ठ लिपिक भगवान गुंजाराम अहिरे यांनी सांगितले.ज्या कपाटांच्या चाव्या मिळाल्या नाहीत ती कपाटे फोडून त्यातील गोपनीय दस्तावेज व कागदपत्रे फाडण्यात आली आहेत. कार्यालयातील संगणक वा अन्य कोणतीही मौल्यवान वस्तू चोरट्यांनी चोरुन नेल्या नाहीत. आमच्या कार्यालयाचे सुरक्षारक्षक वसंत शिगवण हे रोज रात्रपाळीकरिता असतात, परंतु या घटनेच्यावेळी ते ड्युटीवर नव्हते असे अहिरे यांनी सांगितले.रायगड जिल्ह्यातील खारभूमी आणि संरक्षक बंधारे यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून गेली किमान वीस वर्षे पाठपुरावा करण्यात येत आहे. खारभूमी विभागाच्या निधीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे आम्ही अनेकदा विविध सरकारी बैठकांमध्ये नमुद केले आहे. अलिबाग तालुक्यात कुर्डूस ते मानकुळे या खाडी किनारपट्टीत गेल्या ३२ वर्षात संरक्षक बंधारे बांधले नाहीत. अस्तित्वात असलेल्या संरक्षक बंधाºयांची देखभाल व दुरु स्ती केली नाही. परिणामी खाडी किनारच्या एकूण ३६ गावांतील ५ हजार ८३५ शेतकºयांची गेल्या ३२ वर्षात ४८३ कोटी ८९ लाख ६० हजार रु पयांचे नुकसान झाले आहे. ही नुकसान भरपाई शासनाकडून शेतकºयांना मिळावी अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. लोकमतने ती सर्वांच्या समोरआणली.या पार्श्वभूमीवर खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाची चौकशी होणार. त्या चौकशीत पुरावे उपलब्ध होवू नयेत या कारणास्तव ही घरफोडी घडवून आणल्याचा दावा आमचा असून या प्रकरणाची मंत्रालयीन स्तरावर चौकशी व्हावी अशी मागणी शासनाकडे करणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ.भारत पाटणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.या प्रकरणी मंत्रालयस्तरीय चौकशीची मागणी करणारे निवेदन गुरुवारी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना देणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचेजिल्हा समन्वयक राजन भगत यांनी सांगितले.खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग कार्यालय घरफोडी पूर्वीचे संदर्भ१अलिबाग व पेण तालुक्यातील खारभूमी विभागाच्या खारबांधबंदिस्ती व बांध भरतीच्या उधाणामुळे फुटून हजारो एकर भातशेतीमध्ये समुद्राचे खारे पाणी घुसून हजारो शेतकºयांचे कोट्यवधी रु पयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीस खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे यापूर्वी तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त तसेच सचिव स्तरावरील बैठकांमध्ये सिद्ध झाले आहे.२शासनाच्या याच खारभूमी विभागाने अलिबाग तालुक्यात कुर्डूस ते मानकुळे या खाडी किनारपट्टीत गेल्या ३२ वर्षात संरक्षक बंधारे बांधले नाहीत. असलेल्या संरक्षक बंधाºयांची देखभाल व दुरु स्ती केली नाही. परिणामी खाडी किनारच्या एकूण ३६ गावांतील ५ हजार ८३५ शेतकºयांची गेल्या ३२ वर्षात ४८३ कोटी ८९ लाख ६० हजार रु पयांची नुकसानीचे ‘लोकमत’ने शुक्र वार १२ जानेवारी रोजी प्रसिध्द झालेले वृत्त.३झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनास पाठवून शेतकºयांना सवलती जाहीर कराव्यात अशी मागणी करणारे श्रमिक मुक्ती दलाने रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांना निवेदन. आपत्तीकालीन उपायाची गरज असल्याने जिल्हाधिकाºयांनी खारेपाटास प्रत्यक्ष भेट द्यावी, अशीही मागणी के ली.४मंगळवारीच १६ जानेवारी रोजी शहापूर-धेरंड परिसरातील चुकीच्या पद्धतीने झालेल्या भूमी संपादनाची पाहणी अलिबाग प्रांताधिकारी सोनावणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आयुक्तांच्या आदेशान्वये केली. खारभूमी बंधाºयांनाच लागून असणाºया या शेतजमिनींचे संपादन चुकीच्या पद्धतीने झाले असल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले.५या सर्व पार्श्वभूमीवर खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या रायगड जिल्ह्यातील कारभाराच्या चौकशीचे संकेत. शहापूर-धेरंडमधील पाहणी मंगळवारी १६ जानेवारी रोजी झाल्यावर, त्याच रात्री खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या पेण येथील संबंधित कार्यालयात घरफोडी आणि गोपनीय कागदपत्रे फाडून नष्ट करण्यात आली.