अलिबागेत घरफोडी, चार लाखांचा ऐवज लंपास
By निखिल म्हात्रे | Updated: March 7, 2024 17:12 IST2024-03-07T17:11:31+5:302024-03-07T17:12:50+5:30
ममता नगर परीसरातील बंद घराचे लाॅक तोडून सुमारे चार लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या वस्तु अज्ञाताने चोरून नेल्या आहेत.

अलिबागेत घरफोडी, चार लाखांचा ऐवज लंपास
निखिल म्हात्रे, अलिबाग : ममता नगर परीसरातील बंद घराचे लाॅक तोडून सुमारे चार लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या वस्तु अज्ञाताने चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधातअलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियांका सागर,(रा- बाळकृष्ण रेसीडेन्सी, पहिला मजला रुम नं.6 बल्लाळेष्वर नगर, ममता नगरच्या पाठीमागे, चेंढरे ता.अलिबाग) यांच्या घरात चोरी झाली. अज्ञात चोरटयांनी दिनांक ०५ मार्च २०२४ रोजी ६.०० वा ते दि. ०६ मार्च २०२४ रोजी ६.०० वा.सुमारास फिर्यादीच्या घराचा दरवाजा कडी, कोयंडा कोणत्यातरी हत्याराने उपकून, घरामध्ये प्रवेश केला. घराचे बेडरुम मधील कपाटात तसेच बेडमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ४ लाख २ हजार रुपये किंमतीचा एैवज घरफोडीत गेला आहे.
याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात.दं.वि.क. ४५४ , ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास मपोसई मधुरा शेलार करीत आहेत.