बोया आला न झोप उडवून गेला; अलिबागच्या किनाऱ्यावरील 'त्या' परदेशी बोटीबाबत महत्त्वाची माहिती समोर

By निखिल म्हात्रे | Updated: July 8, 2025 19:50 IST2025-07-08T19:47:16+5:302025-07-08T19:50:07+5:30

जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल स्वतः समुद्रात उतरून लोकेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता

Buoy with a GPS tracker was found near a boat on the Korlai beach in Alibaug | बोया आला न झोप उडवून गेला; अलिबागच्या किनाऱ्यावरील 'त्या' परदेशी बोटीबाबत महत्त्वाची माहिती समोर

पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांचा समुद्रात उतरून लोकेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

अलिबाग - रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास कोर्लईच्या समुद्र किनाऱ्यावर परदेशी बोट येल्याचा सिग्नल मिळताच संपूर्ण पोलिस दल तत्परतेने कामाला लागले. एवढेच नव्हे, तर जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल स्वतः समुद्रात उतरून लोकेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या वेळी समुद्रावर होणाऱ्या ओहोटीमुळे ते पोहोचू शकले नाहीत. तपासात असे आढळले की बोटीच्या जवळ जीपीएस ट्रॅकर असलेला बोया होता. त्यामुळे बोयामुळे पोलिसांची झोप उडाली, अशी चर्चा सुरू झाली होती.

कोस्टगार्डचा अलर्ट येताच संपूर्ण पोलिस विभाग तत्परतेने कारवाईत लागला. रायगडच्या किनारपट्टीवर पोलिसांची नजर ठेवण्यात आली होती. सुमारे ५२ पोलिस अधिकारी आणि ५५४ कर्मचारी दिवसरात्र तपासकामात गुंतले होते. कुठेही चूक होऊ नये यासाठी पोलिस अधीक्षक आँचल दलाल स्वतः कोर्लई किनाऱ्यावरून सहा पावलांची उडी घेऊन टग बोटीवर चढले. यामध्ये त्यांनी पाच सहकाऱ्यांच्या मदतीने लक्ष केंद्रीत करुन मोर्चा पुढे नेला. मात्र सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आणि समुद्राची ओहोटी असल्यामुळे टग बोटी तपासस्थळी पोहोचू शकली नाही.

तपासकामातील अपयशाने धीर हरवून न राहता, पोलिसांनी लोकेशनवर असलेल्या बोटीचा नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी सुरक्षा वाढवली. समुद्रातील गस्तीसह रस्त्यांवरही चेकपोस्ट उभारण्यात आले आणि संशयितांवर लक्ष ठेवण्यात आले. या घटनेच्या मुळाशी पोहोचण्यासाठी चौफेरपणे तपास चालू होता. पोलिस अधीक्षक आँचल दलाल पाण्यात उतरल्यामुळे इतर अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढले, आणि धैर्याने ते सर्व तपासकामात गुंतले. संशयितांची धरपकड करण्यात आली. मात्र अधिक तपासानंतर कळाले की जीपीएस ट्रॅकर असलेला बोया भरकटलेला होता. त्यामुळे मोठ्या संकटाचा प्रादुर्भाव टळल्याचे समजले.

एकंदरीत, भरकटलेल्या बोयामुळे पोलिस यंत्रणा सतर्क राहिली असल्याचे स्पष्ट झाले असून येणाऱ्या अपत्तीला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, हे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले आहे.

Web Title: Buoy with a GPS tracker was found near a boat on the Korlai beach in Alibaug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.