शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

ग्रामीण भागातून बीएसएनएलची फोन सेवा हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 3:08 AM

महाड तालुक्यात शिल्लक राहिलेत फक्त खांब : शहरामध्ये फक्त ८५० कनेक्शनच सुरु

दासगाव : एके काळी ग्रामीण भागात आणि खेडोपाड्यांत बीएसएनएलच्या लॅण्डलाइन फोनशिवाय पर्याय नव्हता. संपूर्ण महाड तालुक्यात ६५०० ग्राहक लॅण्डलाइन फोनचा वापर करीत होते. मात्र, आज ही संख्या फक्त ८५० वर शिल्लक असून तीही शहरापुरतीच मर्यादित राहिली आहे. संपूर्ण ग्रामीण भागातून ही सेवा हद्दपार झाली आहे.

३० वर्षे मागचा काळ पहिला तर संपूर्ण भारतावर बीएसएनएल कंपनीची सेवा राज्य करीत होती. ग्रामीण भाग असो किंवा खेडोपाड्यांत या कंपनीच्या लॅण्डलाइन सेवेशिवाय पर्याय नव्हता. सुरुवातीला या कंपनीची लॅण्डलाइन सेवा किंवा मोबाइल सेवा असो कनेक्शन मिळणे कठीण जात होते. तीस वर्षांच्या काळात अनेक खाजगी कंपन्यांनी टॉवर उभे करीत नागरिकांना मोबाइल सेवा देण्यासाठी या रेसमध्ये धाव घेतली असली तरी अद्याप कोणत्याच कंपनीने लॅण्डलाइन सुविधा कोणत्याही ग्राहकाला पुरविली नाही. मात्र, खासगी कंपन्यांकडून मिळणारी चांगली सुविधा आणि कमी खर्च यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांचा कल याकडे वळला आणि हळूहळू बीएसएनएल मोबाइल सेवा तसेच लॅण्डलाइन सेवेची नागरिकांमधून क्रेझ कमी होत गेली.आजच्या परिस्थितीत बीएसएनएल कंपनी ही मागे पडली आहे. महाड तालुक्याचा विचार केला तर या तालुक्यात या कंपनीची लॅण्डलाइन सेवा वापरणारे ६५०० ग्राहक होते. आजच्या घडीला फक्त ८५० शिल्लक राहिले आहेत. तेही शहरामध्ये. ग्रामीण भागातून ही सेवा संपूर्णपणे हद्दपार झाली आहे. याचे कारण नागरिकांना पुरविली जाणारी ही सेवा वेळोवेळी योग्य प्रकारे देण्यात आली नाही. पूर्वीच्या काळात खांब टाकले जात असून त्यावरून तारा टाकून लॅण्डलाइन सेवा पुरविली जात असे. मात्र नंतरच्या काळात अंडरग्राउंड ऑप्टिकल फायबर केबल टाकून ही सेवा सुरू करण्यात आली होती. वारंवार ठिकठिकाणी रस्त्यांच्या कामांसाठी होणारे खोदकाम आणि यापासून ग्राहकांना येणाऱ्या अडचणीकडे कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.

रस्ता कामामुळे सेवा बंदमहाड तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये दोन वर्षांपूर्वी काही प्रमाणात या कंपनीची लॅण्डलाइन सेवा सुरू होती. मात्र, महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामध्ये तसेच अंतर्गत होणाऱ्या रस्त्यांच्या कामांमध्ये वारंवार केबल तुटून खंडित होणाऱ्या सेवेमुळे नागरिक हैराण होऊन सेवा बंद केली. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमध्ये भरमसाट येणाऱ्या बिलांमुळे कंपनीने बिल न भरणाऱ्या अनेक ग्राहकांची सेवा खंडित केली.

टॅग्स :BSNLबीएसएनएल