कर्नाळ्याजवळ पूल खचला, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 12:10 PM2018-06-25T12:10:14+5:302018-06-25T12:11:04+5:30

कर्नाळाजवळील पूल खचल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

The bridge collapsed near Karnala, Mumbai-Goa highway jam | कर्नाळ्याजवळ पूल खचला, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

कर्नाळ्याजवळ पूल खचला, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

Next

रायगड : रायगड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. कर्नाळाजवळील पूल खचल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

राज्यातील विविध भागात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत, तर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. यातच, जिल्ह्यातील कर्नाळाजवळील पूल खचल्याने गेल्या तीन तासांपासून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे आता वाहने पर्यायी मार्गावरुन वळवण्यात येत आहेत. मात्र, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे मुंबईहून गोव्याकडे आणि गोव्याहून मुंबईकडे जाणा-या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

मुंबईसह राज्यात कालपासून काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे.  पावसामुळे मुंबई शहरापेक्षा उपनगरांत आणि ठाणे, पालघर आणि रायगडमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.  मुंबई आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकल उशिराने धावत आहेत. 

दरम्यान, पावसाचा जोर आठवडाभर असाच कायम राहणार असून येत्या 24 तासांत जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 
 
 

Web Title: The bridge collapsed near Karnala, Mumbai-Goa highway jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.