बौद्धवाडी नाक्यावरील स्तंभाची तोडफोड

By Admin | Updated: October 13, 2016 03:58 IST2016-10-13T03:58:25+5:302016-10-13T03:58:25+5:30

मुरुड तालुक्यातील वलके ग्रामपंचायतीअंतर्गत असणाऱ्या मौजे ताडगाव बौद्धवाडी नाक्यावरील आलेला फलक कोणीतरी काढून स्तंभाची तोडफोड

Boudiwadi blockade | बौद्धवाडी नाक्यावरील स्तंभाची तोडफोड

बौद्धवाडी नाक्यावरील स्तंभाची तोडफोड

बोर्ली-मांडला/मुरुड : मुरुड तालुक्यातील वलके ग्रामपंचायतीअंतर्गत असणाऱ्या मौजे ताडगाव बौद्धवाडी नाक्यावरील आलेला फलक कोणीतरी काढून स्तंभाची तोडफोड केल्याने ताडगाव येथील बौद्ध समाज संतप्त झाला आहे. याप्रकरणी बौद्ध समाजाने रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्र ार के ली आहे.
रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीतील ताडगाव येथील बौद्ध समाजाने धम्म प्रवर्तन दिनानिमित्ताने साळाव-रोहा रस्त्यावरील ताडगाव नाक्यावर ताडगाव नामक फलकाचे अनावरण ११ आॅक्टोबर रोजी सकाळी होते. मात्र तो फलक अज्ञात व्यक्तीने १० आॅक्टोबरच्या रात्री काढून सोबत घेऊन गेला, तसेच फलकासाठी उभारण्यात आलेल्या स्तंभाची तोडफोड करण्यात आली, हे कृत्य अज्ञात व्यक्तीने जातीयवाद करण्यासाठी केले आहे.
असे समाजविघातक कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा तपास लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी रेवदंडा पोलीस ठाण्यात नागरिकांकडून करण्यात आली आहे.
ताडगाव नाक्यावरील फलक जो अज्ञात व्यक्ती घेऊन गेला त्याचा तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी करून बौद्ध समाजास न्याय मिळवून द्यावा, अन्यथा रेवदंडा पोलीस ठाण्यासमोर जिल्हास्तरीय आंदोलन करण्यात येईल, असे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) विभागीय अध्यक्ष मिलिंद मोरे यांनी
सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Boudiwadi blockade