तळोजा कारागृहाजवळील तलावात सापडला तरुणाचा मृतदेह
By वैभव गायकर | Updated: August 25, 2023 13:14 IST2023-08-25T13:14:02+5:302023-08-25T13:14:38+5:30
संबंधित घटना आत्महत्या असल्याची माहिती समोर येत आहे.

तळोजा कारागृहाजवळील तलावात सापडला तरुणाचा मृतदेह
लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर, पनवेल:खारघर शहरातील सेक्टर 36 परिसरात तळोजा कारागृहासमोरील तलावात एका 35 ते 40 वयोगटातील तरुणाचा मृतदेह सापड्ल्याची घटना दि.25 रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास घडली आहे.या घटनेचा तपास खारघर पोलीस करीत आहेत. संबंधित घटना आत्महत्या असल्याची माहिती समोर येत आहे.
तळोजा कारागृह परिसरातील या तलावात यापूर्वी देखील अनेक आत्महत्या तसेच पोहताना तरुणांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती.सकाळी मॉर्निंग ओक ला जाताना काही नागरिकांना तरुणाचा मृतदेह दिसल्यावर खारघर पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.अग्निशमन दलाच्या सहाय्याने हा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.प्राथमिक तपासात हि आत्महत्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.मात्र याबाबत अधिकृत माहिती पोलिसांनी दिली नाही.