शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

माजी आमदार मनोहर भोईर यांचा ५० हजार नव्हे तर आता एक लाख मतांच्या फरकाने पराभूत करणार - भाजप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 22:36 IST

Uran News: माजी आमदार मनोहर भोईर यांची उरण मतदार संघात विकास कामांची पाटी कोरीच राहिली आहे.या उलट मतदार संघात कोट्यावधी रुपयांच्या निधींचा वापर करून शेकडो विकासकामे केली आहेत.

-  मधुकर ठाकूरउरण - माजी आमदार मनोहर भोईर यांची उरण मतदार संघात विकास कामांची पाटी कोरीच राहिली आहे.या उलट मतदार संघात कोट्यावधी रुपयांच्या निधींचा वापर करून शेकडो विकासकामे केली आहेत. लोकांची कामेही महेश बालदी मनापासून करीत आहेत.त्यामुळे शनिवारी (१०) पक्षप्रवेशाचा ओघ पाहता आगामी निवडणुकीत उरण विधानसभा मतदारसंघातुन मनोहर भोईर यांचा महेश बालदी हे ५० हजार नव्हे तर आता एक लाख मतांच्या फरकाने पराभव करतील असा दावा भाजपचे आमदार रायगड जिल्हा प्रमुख  तथा नवनिर्वाचित मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी प्रशांत ठाकूर यांनी उरण येथील जाहीर कार्यक्रमातून केला.

उरण भाजपने शनिवारी (१०) कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  भाजपचे आमदार रायगड जिल्हा प्रमुख तथा नवनिर्वाचित मावळ लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत जेएनपीएच्या बहुउद्देशीय सभागृहात शनिवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उरण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.शेकापवर टीका करताना शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी कर्नाळा बॅक बुडविली.त्यामध्ये कष्टकरी,शेतकरी, कामगार आणि गोर-गरीबांचे ५२५ कोटी रुपये बुडवले.सामान्यांचे घामाचे पैसे बुडविणारे माजी आमदार दोन वर्षांपासून तुरुंगात खितपत पडले आहेत.त्यांच्या मुलाचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.कर्नाळा बॅकेतील खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यत लढत राहणार असल्याची ग्वाही देतानाच मतदार संघातील विविध गावांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून दिली.यावेळी त्यांनी  निवडणूकीसाठी सज्ज होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

याआधी उरण मतदार संघात इतक्या वर्षात फक्त ५०० घरकुल उभारण्यात आली आहेत.आता केंद्र, राज्यात पक्षांची सरकारे आहेत.या दोन्ही सरकारच्या जोरावर आदिवासी बांधवांसाठी ४००० घरकुल बांधणार असल्याची ग्वाही उरणचे आमदार महेश बालदी यांनी आपल्या भाषणातून दिली.उरण-नेरुळ रेल्वे मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.त्यामुळे रेल्वे सुरू झाल्यावर तर  उरण मतदार संघात रोजच परिवर्तन पाहावयास मिळेल असा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी माजी आमदार मनोहर भोईर यांच्यावर गावाचेही भलं न करणार आमदार म्हणून टीका केली. कामाचं,विकास कामाबद्दल बोला.व्यर्थ टिका करु नका असा सल्ला देतानाच कार्यकर्त्यांचा विश्वास, केलेल्या विकास कामांच्या बळावर प्रगती साधत पुढे वाटचाल करत  असल्याचे महेश बालदी यांनी सांगितले. या आयोजित कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश कार्यक्रमात उरण मतदार संघातील काही गावांतील अन्य राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.पक्षप्रवेशकर्त्यांचे उपस्थित आमदारांनी स्वागत केले.

टॅग्स :BJPभाजपाRaigadरायगड