शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

बिरवाडी काळ नदीपात्रातील पाण्याला हिरवा रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 11:55 PM

अनेक गावांच्या पाणी योजना अडचणीत; निगडे, वडघर, मोहोत, बोरगाव, भावे ग्रामस्थांची चिंता वाढली

 लोकमत न्यूज नेटवर्कबिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी काळ नदीपात्रातील पाण्याला हिरवा रंग आल्याने अनेक गावांच्या पाणी योजना अडचणीत सापडल्या आहेत. निगडे, वडघर, मोहोत, बोरगाव भावे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची चिंता वाढली आहे.काळ नदीपात्रावर खरवली बिरवाडी गावांना जोडून कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधून काळ नदीपात्रातील पाणी अडविण्यात आल्याने पावसाळ्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा काळ नदीपात्रामध्ये जमा होतो. मात्र, यावर्षी काळ नदीपात्रातील पाण्याला हिरवा रंग चढला असल्याने पाणी दूषित होऊन झाले आहे. या पाण्यावर अवलंबून असणारी निगडे, वडघर, मोहोत, बोरगाव, भावे या गावांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे.  काळ नदीपात्राच्या बाजूला वसलेल्या खरवली, काळीज, बिरवाडी या गावांमधील सांडपाणी काळ नदीपात्रात मिसळते. त्यासोबतच अतिरिक्त एमआयडीसीमधील कारखान्यांचे प्रदूषित पाणी मिसळत असल्याने  नदीच्या  पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांच्या पाणी योजना अडचणीत सापडल्याने धरण उशाला कोरड घशाला असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

काळ नदीपात्रामध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध व्हावा, याकरिता कोल्हापुरी बंधारा उभारण्यात आला आहे. मात्र, दरवर्षी काळ नदीपात्रातील पाणी प्रदूषित होत असल्याने मोहोत, निगडे, भावे ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. याबाबत अनेकवेळा संबंधित शासकीय कार्यालये, शासकीय अधिकारी यांच्याजवळ पत्रव्यवहार करूनदेखील समस्या सुटत नसल्याने पाणी समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या विभागातील ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी सरपंच रामचंद्र निकम यांनी दिला आहे.