शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटले, दरीकडे निघालेली बस झाडाला अडकली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 09:49 IST

बसमधील प्रवाशांना तातडीने बसच्या बाहेर काढण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : अलिबाग वडखळ मार्गावर कार्ले खिंड येथील वळणावर एसटी बसला अपघात झाल्याची घटना आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली. एका झाडाला बस अडकल्याने मोठा अनर्थ टळला. बसमधील प्रवासी हे सुखरूप असून सुदैवाने कोणीही जखमी नाही झाले. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडला आहे. पोलीस, जिल्हा प्रशासन, एसटी प्रशासन घटनास्थळी दाखल झाले होते. 

अलिबाग आगारातून सकाळी पावणे आठ वाजता अलिबाग पनवेल ही बस प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाली होती. कार्ले खिंड येथील धोकादायक वळणावर बस आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीच्या दिशेने वळली. सुदैवाने बाजूला असलेल्या झाडाला बस अडकली, त्यामुळे अनर्थ टळला. बसमधील प्रवाशांना तातडीने बसच्या बाहेर काढण्यात आले. अपघातात बसचा अक्सलही तुटला होता. 

पावसाळा असल्याने रस्ते हे निसरडे झाले आहेत. त्यामुळे वाहन चालवताना ते घसरण्याची शक्यता असते. भरधाव वेगाने वाहन चालवताना अनेकदा अपघाताची शक्यता असते. कार्ले खिंडीत झालेला हा अपघात ही असाच झाला असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :RaigadरायगडBus Driverबसचालकstate transportएसटीAccidentअपघातalibaugअलिबाग