शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: एसटी बस एकमेकांवर आदळून भीषण अपघात; १८ ते २० प्रवासी जखमी, २ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 10:49 IST

जखमींना तत्काळ अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत.

राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क 

अलिबाग :अलिबाग रेवदंडा मार्गावर बेलकडे फाटा येथे वळणावर दोन एसटी बसला भीषण अपघात घडल्याची घटना सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दोन चालक गंभीर जखमी झाले असून १८ ते २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. दोन्ही बसचे चालक हे गंभीर जखमी झाले असून एकाचे पाय तुटले असून दुसऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तत्काळ अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत. घटनास्थळी पोलिस तसेच एस टी प्रशासन, स्थानिक यांनी धाव घेऊन जखमींना मदत केली आहे. 

महाजने रेवदंडा ही बस रेवदंडाकडे जात होती. तर मुरुड बार्शी ही बस अलिबागच्या दिशेने येत होती. आक्षी येथील वळणावर दोन्ही बस समोरासमोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून एकमेकाला धडक दिली. यामध्ये महाजने रेवदंडा बसच्या चालकाच्या पायाला तर बार्शी बसच्या चालकाला पायाला गंभीर दुखापत झाली आहे. बसमधील १८ ते २० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. 

अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्तांना मदत केली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. किरकोळ जखमी प्रवाशांना उपचार नंतर सोडण्यात आले आहे. अपघातामुळे वाहतूक विस्कळित झाली होती,  त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली.

टॅग्स :state transportएसटीBus DriverबसचालकAccidentअपघातalibaugअलिबागRaigadरायगड