शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

ब्लॅक स्पॉट शोधून प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 2:53 AM

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच ग्रामीण भागात जाणारे रस्ते यावर होणारे अपघात टाळण्यासाठी ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून काढून, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी दिले आहेत.

विशेष प्रतिनिधी अलिबाग : रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच ग्रामीण भागात जाणारे रस्ते यावर होणारे अपघात टाळण्यासाठी ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून काढून, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे निर्देश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रायगड जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत डॉ. सूर्यवंशी बोलत होते. या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पासरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, राष्ट्रीय महामार्ग महाड विभागाचे कार्यकारी अभियंता एस. के. सुरवसे, वाहतूक पोलीस शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक मनोजकुमार म्हात्रे, पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. गतिरोधकांना रंग लावा, साइडपट्ट्या भरून घ्या.जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट बाबत उपाययोजना करण्यासाठीच्या निधीची तरतूद, अंमलबजावणीचे वेळापत्रक अंमलबजावणीसाठी जबाबदार अधिकारी यांची निश्चिती करावी. या वेळी जिल्ह्यातील रस्त्यावर असलेल्या अधिकृत व अनधिकृत गतिरोधकांचाही आढावा घेण्यात आला. अपघात कमीत कमी होण्याच्या दृष्टीने विविध ठिकाणी गतिरोधक तयार केले आहेत. त्या गतिरोधकांना रंग लावून ते चालकाच्या लक्षात येतील, अशी व्यवस्था करावी तसेच रस्त्यांच्या बाजूच्या साइडपट्ट्या भरून घ्याव्यात, जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल, असेही निर्देश त्यांनी पुढे दिले. जिल्ह्यातील सर्व गतिरोधकांचा सविस्तर तालुकानिहाय आढावा घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. खड्डेमय रस्ते दुरुस्तीकरिता जबाबदार असणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र या महत्त्वाच्या बैठकीस गैरहजर होते.>रायगड जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत बोलताना रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी दिसत आहेत तर शेजारी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर व अन्य अधिकारी.