नियोजनानुसार पार पडल्या 'बाटू'च्या परीक्षा; कुलगुरू प्रा. वेदला रामा शास्त्री यांच्या नियोजनाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 11:11 PM2020-10-10T23:11:57+5:302020-10-10T23:12:20+5:30

अंतिम वर्षाच्या सर्व रेग्युलर परीक्षा आज संपन्न झालेल्या असून, बॅकलॉग विषयाच्या परीक्षा उद्या सुरू होणार आहेत.

Batu's exams passed as planned; Vice Chancellor Pvt. Success to the planning of Vedala Rama Shastri | नियोजनानुसार पार पडल्या 'बाटू'च्या परीक्षा; कुलगुरू प्रा. वेदला रामा शास्त्री यांच्या नियोजनाला यश

नियोजनानुसार पार पडल्या 'बाटू'च्या परीक्षा; कुलगुरू प्रा. वेदला रामा शास्त्री यांच्या नियोजनाला यश

Next

माणगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणरेच्या अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा संपन्न झाल्या. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे हे सर्वच विद्यापीठांसाठी मोठे आव्हान होते. यूजीसीच्या नियमानुसार व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सर्व विद्यापीठांना या परीक्षा घेणे अनिवार्य होते. बाटूतर्फे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेत उपाययोजनांचा अवलंब करीत परीक्षा नियोजनबद्ध घेण्यात आल्या.

अंतिम वर्षाच्या सर्व रेग्युलर परीक्षा आज संपन्न झालेल्या असून, बॅकलॉग विषयाच्या परीक्षा उद्या सुरू होणार आहेत. विद्यापीठातर्फे मॉडेल प्रश्नसंच निर्माण करून विद्यार्थ्यांना दिले गेले. परीक्षेबाबत अनेक शंका, अनेक अडचणी विद्यार्थ्यांच्या मनात होत्या. आॅनलाइन परीक्षेच्या प्रणालीबाबतीत विद्यार्थ्यांना असलेल्या प्रश्नांचे निरसन आॅनलाइन मीटिंगद्वारे विद्यापीठाने तसेच महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले.

मुख्य परीक्षेपूर्वी अनेक वेळा सराव परीक्षा देण्याची सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संपूर्ण आॅनलाइन परीक्षा प्रणाली समजून घेतली; त्यामुळे परीक्षा देताना त्यांना कोणतीही अडचण आली नाही, अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वेदला रामा शास्त्री यांनी परीक्षेच्या प्रत्येक बाबीचे नियोजनबद्ध स्वरूप तयार केले. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत यावर त्यांनी भर दिला. विद्यार्थी व पालक यांच्यावर आर्थिक भार पडू नये हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेण्यात आले नाही. परीक्षेच्या पूर्वतयारीचे अवलोकन करताना तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कुलगुरू, परीक्षा नियंत्रक डॉ. व्ही.एस. साठे व सर्वच संलग्नित महाविद्यालयांतील प्राचार्यांचे, प्राध्यापकांचे कौतुक केले.

आॅनलाइन प्रणालीचा योग्य वापर
आॅनलाइन परीक्षा आयोजित करण्यात इतर अनेक विद्यापीठांना अडचण येत असताना महाराष्ट्रातील एकमेव तंत्रशास्त्र विद्यापीठ बाटूने आॅनलाइन परीक्षा घेण्याबाबतचे एक उत्कृष्ट उदाहरण सादर केलेले आहे. विद्यार्थी, पालक आणि समाजातील इतर घटकांकडून त्याचे कौतुक होत आहे. सुयोग्य नियोजन आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचणी आल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या शंकांचे आधीच निरसन झालेले होते; शिवाय सरावसुद्धा उपयोगी पडला, असे विद्यापीठ कुलगुरू डॉ. वेदला रामा शास्त्री यांनी या वेळी सांगितले.

या परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागले नाही. विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन बहुविकल्पीय पर्यवेक्षित परीक्षा पद्धतीचा अवलंब केला गेला. विद्यार्थ्यांना आपल्या घरूनच फोन, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर करून ही परीक्षा देता येईल अशा प्रणालीचा वापर करण्यात आला.

 

Web Title: Batu's exams passed as planned; Vice Chancellor Pvt. Success to the planning of Vedala Rama Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.