पोलादपूरचा शिलकी अर्थसंकल्प
By Admin | Updated: March 12, 2016 02:08 IST2016-03-12T02:08:00+5:302016-03-12T02:08:00+5:30
ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर २०१६-१७ साठी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अश्विनी गांधी यांनी पहिला अर्थसंकल्प नगरपंचायत कार्यालयात सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला

पोलादपूरचा शिलकी अर्थसंकल्प
पोलादपूर : ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर २०१६-१७ साठी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अश्विनी गांधी यांनी पहिला अर्थसंकल्प नगरपंचायत कार्यालयात सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला. पहिल्यांदाच सादर केलेला अर्थसंकल्प शिलकीचा आहे असे अर्थ व नियोजन सभापती प्रसन्ना बुटाला यांनी सांगितले. विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे.
सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा, पथदिवे, शहरातील अंतर्गत रस्ते, आरोग्य या बाबींना प्राधान्य देण्यात आले असल्याचे अर्थ व नियोजन सभापती प्रसन्ना बुटाला यांनी सांगितले. सर्वानुमते हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून विविध विकासकामांना प्राधान्य देण्यात येणार आहे व अपूर्ण पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेणार, असे नगराध्यक्षा अश्विनी गांधी यांनी सांगितले. अर्थसंकल्प मंजुरीकरिता गटनेते उमेश पवार व राजन पवार यांचा सहभाग होता तर प्रसन्ना बुटाला, राजन पाटणकर, लक्ष्मण जगताप, नागेश पवार, नीलेश सुतार, कल्पना सवादकर यांनी चर्चेत विशेष सहभाग घेतला. या अर्थसंकल्पात काय नागरिकांना मिळणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. शहराचा झपाट्याने विकास होत असताना रस्ते अरु ंद होत आहेत, पाणीप्रश्न महिलांसाठी महत्त्वाचा होता, नगरपंचायत तो कसा सोडवते याकडे महिलावर्गाचे लक्ष होते. सार्वजनिक शौचालय नसल्याने शहरात कामानिमित्त येणाऱ्यांची होणारी कुचंबणा थांबवण्यासाठीही नियोजन असल्याचे सांगण्यात आले.
अर्थसंकल्पाकडून नागरिकांना भरपूर अपेक्षा होत्या, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर याबाबत संमिश्र प्रतिक्रि या उमटल्या. (वार्ताहर)