शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

‘बाळा मी आलेच’, म्हणत माऊलीने मागे पाहताच चार वर्षीय चिमुरडी क्षणात गायब, नाल्याजवळ सापडली चप्पल अन् कपडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:36 IST

Pen News: पेण तालुक्यातील हेटवणे वाडीतील चार वर्षांची चिमुकली बुधवारी, १२ नोव्हेंबरला सकाळी आईसोबत गावाबाहेरच्या शौचालयात गेली असता काही मिनिटांतच अचानकपणे बेपत्ता झाली.

- दत्ता म्हात्रेपेण - पेण तालुक्यातील हेटवणे वाडीतील चार वर्षांची चिमुकली बुधवारी, १२ नोव्हेंबरला सकाळी आईसोबत गावाबाहेरच्या शौचालयात गेली असता काही मिनिटांतच अचानकपणे बेपत्ता झाली. ‘बाळा आलेच मी’, असे म्हणून आईने मागे पाहिले असता काही क्षणातच मुलगी गायब झाली. आईच्या आरडाओरडीनंतर ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली, मात्र मुलीचा काहीच पत्ता लागला नाही.

गावाला लागून असलेल्या घनदाट जंगलात रात्रीपर्यंत शोधकार्य सुरू ठेवण्यात आले. दरम्यान, शाेधमाेहीम सुरू असताना ग्रामस्थांना मुलीची चप्पल आणि कपडे नाल्याजवळ सापडले, मात्र मुलगी मात्र कुठेच सापडली नाही. या घटनेने गावात संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, पाेलिसांचाही तपास  सुरू आहे. 

घातपात की अन्य काही?शोधमोहीम युद्ध पातळीवर सुरू असून ड्रोन कॅमेरा, पोलिस श्वान पथक, ग्रामस्थ असे २०० जण या शोधमोहिमेत सहभागी झाले असून, आतापर्यंत हाती काहीच लागले नसल्याने कुटुंबीयांची अवस्था बिकट झाली आहे. पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी घटनेची गंभीर दखल घेत पेण पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सीआरपी, क्यूआरटी, श्वानपथक आणि खोपोली बचाव पथकाला घटनास्थळी पाठविले. शोधमोहीम सुरू असली, तरी २४ तास उलटूनही चिमुकलीचा थांगपत्ता लागलेला नाही. परिसरात संभ्रम आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, घातपात की अन्य काही? या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Missing Girl: Mother Turns Back, Child Vanishes Near Pen

Web Summary : A four-year-old girl disappeared near Pen after her mother briefly turned away. Her clothes and slippers were found near a drain. Police and villagers are searching the dense forest, suspecting foul play. The search continues with no leads after 24 hours, intensifying family's distress.
टॅग्स :Raigadरायगड