एक्सेल नाक्यालगत विद्युत वाहिनीला आग
By Admin | Updated: May 11, 2017 02:05 IST2017-05-11T02:05:44+5:302017-05-11T02:05:44+5:30
रोहा-कोलाड रस्त्यावर एक्सेल नाक्यालगत असलेल्या वीज वाहिनीच्या ट्रान्सफॉर्मर व डीपीखाली बुधवारी अचानक आग लागली.

एक्सेल नाक्यालगत विद्युत वाहिनीला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
धाटाव/ रोहा : रोहा-कोलाड रस्त्यावर एक्सेल नाक्यालगत असलेल्या वीज वाहिनीच्या ट्रान्सफॉर्मर व डीपीखाली बुधवारी अचानक आग लागली. यामुळे परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. अग्निशामक दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणली. मात्र या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्यामुळे संकट टळल्याचे समोर आले आहे.
बुधवारी दुपारी ३.३० दरम्यान रोहा- कोलाड रस्त्यावर एक्सेल नाक्यालगत उघडी डीपी व ट्रान्सफॉर्मर संबंधित असलेली विद्युतवाहिनी गरम झाल्याने अचानक आग लागली. या आगीची झळ जवळच जमिनीवर असलेल्या गवताने पेट घेतल्यामुळे याची झळ डीपी व ट्रान्सफॉर्मरला बसली. ट्रान्सफॉर्मरमधील आॅइलची सुद्धा गळती लागल्याचे पहावयास मिळाले. यामध्ये ट्रान्सफॉर्मर व डीपीचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती नजीकच्या अग्निशामक दलाला मिळताच अवघ्या काही मिनिटांमध्ये अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. जळालेल्या विद्युत वाहिन्यांमुळे कारखान्यांतील वसाहत, औद्योगिक विकास महामंडळाचे सामायिक सुविधा केंद्र, एम.बी.मोरे फाउंडेशन कॉलेज व इतर परिसरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होतो. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण कंपनीचे अधिकारी वानखेडे, नवगणे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी हजर राहून पाहणी केली व दुरु स्तीच्या कामाला सुरुवात केली.