शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

कर्जतमध्ये महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे, राज्य सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 03:42 IST

Karjat News : राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने वीजबिल थकीत असलेल्या ७५ लाख वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाने महावितरण विभागाच्या कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन जाहीर केले होते.

कर्जत - राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने वीजबिल थकीत असलेल्या ७५ लाख वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाने महावितरण विभागाच्या कार्यालयांना टाळे ठोको आंदोलन जाहीर केले होते. कर्जत तालुक्याचे महावितरण कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली आणि कार्यालयाबाहेर राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.मार्च २०२० पासून महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना शॉक देताना कोरोनाचे पार्श्वभूमीवर अधिक रकमेची वीज देयके पाठवली. नेहमीप्रमाणे अधिक रकमेची बिले आल्याने वीज ग्राहक हैराण आहेत. त्यात अनेक वीज ग्राहकांनी अनेक महिने बिले भरली नाहीत. राज्यातील वीजबिल न भरणाऱ्या अशा ७५ लाख वीज ग्राहकांची वीज तोडण्याचा आदेश राज्य सरकारच्या ऊर्जा विभागाने दिले आहेत. त्यामुळे राज्यभरात आज ५ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षाने महावितरण कार्यालयाबाहेर टाळे ठोको आंदोलन जाहीर केले होते. कर्जत तालुक्यात भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या नेतृत्वाखाली कर्जत भिसेगाव येथील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन केले. त्यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे, जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे आदींसह महिला पदाधिकारी शर्वरी कांबळे आदी उपस्थित होते.महावितरण कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्ते वाढीव वीजबिल भरण्याबाबत आणि वीज तोडण्याच्या निर्णयाविरोधात आक्रमक झाले होते. मात्र भाजपच्या आक्रमक भूमिकेवर महावितरणचे सहाय्यक अभियंता गणेश देवके हे स्वतः कार्यालयाबाहेर आले आणि आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ लागले. कर्जतचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला होता.  

समस्यांबाबत चर्चा महावितरण कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्ते वाढीव वीजबिल भरण्याबाबत आणि वीज तोडण्याच्या निर्णयाविरोधात आक्रमक झाले  होते. शेवटी राज्य सरकार विरुद्ध घोषणाबाजी करून भाजपचे  कार्यकर्ते यांनी सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयात बसून वाढीव वीजबिले आणि महावितरण  संबंधी अन्य समस्याबाबत चर्चा  केली.महावितरणविरोधात टाळा ठोको आंदोलनपनवेल : राज्यातील वीजग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविण्याचे काम करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात पनवेल तालुका व शहर भाजपच्या वतीने भिंगारी येथील महावितरण कार्यालयात शुक्रवारी ‘टाळा ठोको, हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. १२ महिन्यांचे १२०० युनिटचे बिल माफ करा तसेच शेतकऱ्यांचे किमान पाच वर्षे वीज कनेक्शन कापू नये, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपचे तालुका मंडल अध्यक्ष अरुण भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे आदींसह कार्यकर्ते व वीजग्राहक सहभागी झाले होते. वीजबिल कमी करा, गोरगरिबांना बिलात माफी द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.तिघाडी सरकारच्या बिघाडी कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे. वीजबिल कमी करण्याऐवजी त्यात वाढ करण्याचे काम करत जनतेला वेठीस धरले आहे. ७५ लाख वीजग्राहकांची वीज कट करण्याचा फतवा राज्य सरकारने काढला आहे. या निर्दयी सरकारचा धिक्कार करत असून, सरकारला जाग न आल्यास ऊर्जामंत्र्यांना जनता उग्र आंदोलनाचा शॉक दिल्याशिवाय राहणार नाही.- विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, युवा मोर्चा नागोठणेत भाजपचा महावितरणवर मोर्चा नागोठणे : वीजबिले कमी करावी, बिले भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, या मागण्यांसाठी शुक्रवारी नागोठणे विभाग भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी रोहे तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर यांच्या हस्ते महावितरणचे सहायक अभियंता वैभव गायकवाड यांना निवेदन देण्यात येऊन निषेध करण्यात आला.लॉकडाऊनच्या काळात मध्य प्रदेश, गुजरात, केरळ यासारख्या राज्यांनी वीजबिलांत ज्याप्रमाणे ५० टक्के सवलत दिली आहे, त्याप्रमाणे राज्यातील महाआघाडी सरकारनेसुद्धा सवलत द्यावी, अशी निवेदनात मागणी केली आहे. यावेळी तालुका उपाध्यक्ष मनोज धात्रक, तालुका सरचिटणीस आनंद लाड, संतोष लाड, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर शिर्के, विठोबा माळी, रोहा तालुका महिला आघाडी चिटणीस अपर्णा सुटे, नागोठणे विभाग महिला आघाडी अध्यक्षा श्रेया कुंटे, प्रियंका पिंपळे, ज्येष्ठ नेते मारुती शिर्के, तिरतराव पोलसानी, राजेंद्र लवटे, सुभाष पाटील आदींसह विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते. मुरुडमध्ये महावितरणवर भाजपचा हल्लाबोल बोर्ली-मांडला : राज्यातील  वीज ग्राहकांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वेठीस धरून कारभार चालविण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने चालविले आहे. याचा निषेध करण्यासाठी आणि वीज ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचे दक्षिण  रायगड जिल्हाध्यक्ष ॲड. महेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली  तालुका अध्यक्ष महेंद्र  चौलकर, शहर अध्यक्ष उमेश माळी यांनी शुक्रवारी सहकाऱ्यांसमवेत मुरुडमधील महावितरणला टाळे ठोकून हल्लाबोल आंदोलन केले.  यानंतर वीज अभियंता सचिन येरेकर यांना एक निवेदन देण्यात आले.यावेळी भाजप तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, भटक्या विमुक्त जाती रायगड जिल्हा अध्यक्ष शैलेश काते, शहर अध्यक्ष उमेश माळी, तालुका उपाध्यक्ष विनोद (बाळा)भगत, सरचिटणीस नरेश वारगे, तालुका संघटन सरचिटणीस प्रवीण  बैकर, हनिफ उलडे, जनार्दन खोत, जीवन सुतार, सुदाम वाघिलकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते  उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजRaigadरायगडBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार