शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रोह्यातील भाटे वाचनालयात साडेआठ लाखांचा अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 00:19 IST

रोह्याच्या भाटे सार्वजनिक वाचनालयात अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांच्या रेट्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

रोहा : रोह्याच्या भाटे सार्वजनिक वाचनालयात अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर नागरिकांच्या रेट्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या संस्थेचे आॅडिट रिपोर्ट हाती आल्यानंतर रोहा अष्टमी सिटीझन्स फोरमने बुधवारी बैठक बोलावली होती. यावेळी रोहा भाटे वाचनालयात ८ लाख ४३ हजार ८११ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. हा सर्व घटनाक्रम पाहता हा अपहार संगनमताने झाल्याचा संशय व्यक्त होत असल्याने सिटीझन्स फोरमच्या वतीने पोलिसांत वेगळी तक्रार देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.सप्टेंबर२०१८ पासून या संस्थेत आर्थिक गैरव्यवहार आणि अफरातफर सुरू होती. संचालक मंडळाने या कालावधीत संबंधितांच्याविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई केली नव्हती. गावातील नागरिकांनी याविरोधात आवाज उठवीत संचालक मंडळास धारेवर धरल्याने अखेर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याबाबतचे आॅडिट रिपोर्ट आल्यानंतर बुधवारी शासकीय विश्रामगृह येथे रोहा अष्टमी सिटीझन्स फोरमची बैठक निमंत्रक आप्पा तथा प्रदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यामध्ये भाटे वाचनालयाचे करण्यात आलेले आॅडिट रिपोर्ट पदाधिकारी यांनी पोलिसांत अद्याप दिलेले नाही, ते देणे. वाचनालयातील विविध घटनाक्रम पाहता, हा सर्व गैरव्यवहार संशयास्पद तसेच संगनमताने झाले असल्याचे दिसून येत असल्याने फोरमच्यावतीने पोलिसांकडे वेगळी तक्रार देणे. वाचनालयातून तसेच जिल्हा सहकारी संस्था निबंधक यांच्याकडून विविध कागदपत्रे मिळविणे. मागील तीन वर्षांत हॉल वापरासाठी दिलेल्या तारखा आणि संस्थेला भाड्यापोटी आलेल्या रकमांचे तपशील मागवून घेणे, त्याची तपासणी करणे. काही स्वार्थी प्रवृत्तींनी वाचनालयात आपली संस्थाने थाटण्यासाठी त्यांना अडचणीचे ठरणाऱ्या शेकडो वाचकांचे वार्षिक तसेच आजीवन सभासदत्व रद्द केले होते. या संस्थेतील सर्व गैरप्रकार पाहता अनेक रोहेकर तसेच वाचक येथे सभासद होण्यास निरुत्साही दिसून येत. तरी सर्व भूतपूर्व सभासदांची माहिती घेऊन, त्यांनी भाटे वाचनालयात पुन्हा सक्रिय व्हावे, त्याचबरोबर आपल्या तालुक्यातील तरुण तसेच नवोदित वाचकांनी सभासद व्हावेत, यासाठी संपर्क जाहीर आवाहन करणे आदी महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत निर्णय घेण्यात आले. या बैठकीस श्रीनिवास वडके, नितीन परब, संजय कोनकर, श्रीकांत ओक, दिलीप वडके, महेश सरदार, विजय देसाई, राजेंद्र जाधव, सतीश साठे, विनोद पटेल, सागर जैन आदींसह नागरिक उपस्थित होते.