एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप; मार्च महिन्यातच तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:22 IST2021-04-06T00:22:22+5:302021-04-06T00:22:30+5:30

- निखिल म्हात्रे अलिबाग : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबरोबरच तापमानातदेखील वेगाने वाढ होत आहे. मार्च महिन्यातच तापमान ४० ...

April will increase district temperature | एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप; मार्च महिन्यातच तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत

एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ताप; मार्च महिन्यातच तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत

- निखिल म्हात्रे

अलिबाग : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबरोबरच तापमानातदेखील वेगाने वाढ होत आहे. मार्च महिन्यातच तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे एप्रिल महिन्यात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

जिल्ह्यात आज ३२ अंश सेल्सिअस तापमान होते. त्यामुळे उष्णताही वाढली होती. जिल्ह्यात मार्च, एप्रिल व मे महिन्यांत सर्वाधिक तापमान असते. त्यामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळतात. यंदा मात्र, तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी उन्हात घराबाहेर पडू नये, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. सोमवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३२, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस होते. पुढील महिन्यात जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले आहेत. आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

असा राहिला आठवडा
जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कडाक्याचे ऊन तापत आहे. रविवारी ३१ कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर शनिवारी ३०, शुक्रवारी ३२, गुरुवारी ३३, बुधवारी ३४ व मंगळवारी कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस होते.

सोमवारचे रेकॉर्ड
सोमवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३२, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअस होते.
तापमान वाढल्याने नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. सोमवारी दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला.

Web Title: April will increase district temperature