शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

नळपाणी योजना मंजूर; मात्र कामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:56 PM

म्हसळेतील नागरिकांमध्ये संभ्रम; अधिकारी-ग्रामीण पाणीपुरवठा समितीमध्ये समन्वयाची गरज

- अरुण जंगम म्हसळा : तालुक्यातील अनेक गावात नळपाणी पुरवठा योजना अपूर्णावस्थेत आहेत, तर काही गावांत काम प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे नळपाणी पुरवठा योजनांच्या बाबतीत म्हसळा तालुक्यात ‘कही खुशी कही गम’ असे वातावरण आहे. काही गावांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचले असले, तरी काही गावांच्या वेशीवर जलवाहिनी पडून आहेत. दुसरीकडे तांत्रिक कारणे दाखवून योजनांच्या फायली लाल फितीत गुंडाळल्या आहेत.तालुक्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल नळपाणी पुरवठा योजना आणि भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत गावागावात नळपाणी योजनांची कामे सुरू आहेत. यामधे १४ गावांच्या योजना प्रगतिपथावर आहेत. त्यापैकी गोंडघर मोहल्ला व काळसुरी नळ योजना विभागीयस्तरावर सादर करून तांत्रिक समितीसमोर सादरीकरण व मंजुरी प्राप्त ई-निविदा स्तरावर आहेत. तर तुरुंबाडी नळ योजनेतील विहीर खोदकाम पूर्ण झाली असून कार्यक्षेत्रात पाइपचा पुरवठा करण्यात आला आहे. सुरई मोहल्ला, मांदाटणे व पानवे नळ योजनेचा कार्यादेश प्राप्त झाले आहे.खारगाव बुद्रुक योजनेत गुरुत्वीय वाहिनीचे ३३०० मीटरपर्यंतचे काम प्रगतीत आहे. केलटे बाउल कोंड योजनेच्या ऊर्ध्ववाहिनीचे व साठवण टाकीचे तर सोनघर योजनेत पंपघराचे काम प्रगतीत आहे.रेवळी नळ योजनेची फेर सादरीकरणानंतर मंजुरी प्रलंबित आहे. साळविंडे (वाडांबा) योजनेचे गुरुत्वीय वाहिनीचे काम पूर्ण असून चेंबर प्रगतीत आहे. कोंझरी नळ योजनेबाबत तांत्रिक छाननी समितीसमोर सादरीकरण करण्यात आले आहे. ठाकरोली नळ योजनेची विहीर पूर्ण असून, पंपघर प्रगतीत आहे. वावे नळ योजना ई-निविदा स्तरावर आहे.भारत निर्माण कार्यक्रम व राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम पाणी पुरवठा सुरू असलेल्या; परंतु आर्थिकदृष्ट्या अपूर्ण योजनांमध्ये सुरई नळपाणी पुरवठा योजना अंदाजपत्रकीय रक्कम ४०.९२ लाख, सुरई बौद्धवाडी योजना अंदाजपत्रकीय रक्कम ५४.८७ लाख, घोणसे निवाची वाडी योजना अंदाजपत्रकीय रक्कम ६२.३१ लाख, अशा तीन योजनांचा समावेश असून त्या पूर्ण करण्याची कार्यवाही सुरू आहे.आॅक्टोबर २०१९ अखेर पूर्ण झालेल्या नळपाणी पुरवठा योजनानेवरुळ, लेप, वांगणी, कणघर, जांभूळ, चाफेवाडी, ढोरजे, पांगलोली, केलटे, रुद्रवट, लेप गौळवाडी, वारळ हरिजनवाडी, दगडघुम, म्हसळा गौळवाडी, पाभरे, तोंडसुरे प्रा., देवघर कोंड, खामगाव गौळवाडी, मेंदडी कोंड अशा एकूण ४८४.२४ लाख रकमेच्या नळपाणी योजना पूर्ण झाल्या आहेत. यापैकी नेवरुळ योजनेसंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात गटविकास अधिकारी यांच्या सभेमध्ये त्रुटींची पूर्तता करणेबाबत सूचना देण्यात आल्या असून, समिती व ग्रामपंचायतीकडून आवश्यक दाखले अप्राप्त आहेत. तसेच लेप व पांगलोली नळपाणी योजनेबाबत २९ डिसेंबर २०१८ रोजी त्रुटींची पूर्तता करण्यासाठी समितीला सूचना देण्यात आल्या आहेत. लेप गौळवाडी नळपाणी योजना बाबतीत लेखा परीक्षण बाकी आहे.केलटे बाउल कोंड योजनेच्या ऊर्ध्ववाहिनीचे व साठवण टाकीचे तर सोनघर योजनेत पंपघराचे काम प्रगतीत आहे.सुरई नळपाणी पुरवठा योजना अंदाजपत्रकीय रक्कम ४०.९२ लाख, सुरई बौद्धवाडी योजना अंदाजपत्रकीय रक्कम ५४.८७ लाख, घोणसे निवाची वाडी योजना अंदाजपत्रकीय रक्कम ६२.३१ लाख, अशा तीन योजना अपूर्ण आहेत.या योजना अद्याप अपूर्णचभारत निर्माण कार्यक्रमांतर्गत घोणसे वडाचीवाडीतील (विचारेवाडी) नळपाणी पुरवठा योजनेसाठी २००७-८ मध्ये ३९.९० लाखांचा निधी रुपये मंजूर करण्यात आला. या योजनेची अंतिम कार्यवाही सुरू आहे.सर्वात महत्त्वाची व म्हसळा शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली म्हसळा नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रात येणारी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत २००९-१० मध्ये मंजूर करण्यात आलेली १६६.०० लाख रुपयांची योजना तीन वेळा भूमिपूजन करूनही आजही अपूर्ण अवस्थेत आहे.घोणसे वडाचीवाडी (विचारेवाडी) आणि म्हसळा नळपाणी पुरवठा योजना, अशा दोन मोठ्या एकूण २०७.९० लाखांचा खर्च अपेक्षित असलेल्या योजनाही अपूर्णावस्थेत आहेत.गावाचे नाव अंदाजपत्रकीयरक्कम (लाखांत)गोंडघर मोहल्ला ४८.६९तुरुंबाडी १३२.००काळसुरी ११६.००सुरई मोहल्ला ४४.७०खारगाव बुद्रुक ३४.७६मांदाटणे २१.६५केलटे बाउलकोंड १६.१८सोनघर ०७.४२रेवळी २५.००साळविंडे (वाडांबा) २०.२५ठाकरोली २१.०९पानवे २९.८४वावे ७६.००