राजकारणात पाच महिन्यांत काहीही होऊ शकते : दानवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 06:17 IST2025-01-31T06:16:50+5:302025-01-31T06:17:12+5:30
द्धवसेनेच्या कर्जत विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

राजकारणात पाच महिन्यांत काहीही होऊ शकते : दानवे
लोकमत न्यूज नेटवर्क , कर्जत : रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा वाद हा तटकरे यांच्यावरून नसून, भाजपविरोधात आहे. त्यामुळे राज्यात सत्ता बदलण्याचे संकेत मिळत असून, पाच महिन्यांत राज्यातील राजकारणात काहीही होऊ शकते, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कर्जत येथे गुरुवारी केला. उद्धवसेनेच्या कर्जत विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
... तर निश्चित यश मिळेल
संघर्ष हा शिवसैनिकांच्या पाचवीला पुजलेला आहे. प्रत्येक निवडणूक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसारखी लढविली तर यश निश्चित मिळते, असेही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रसाद भोईर, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी, उपसंघटिका अनिता पाटील, कर्जतचे तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, आदी उपस्थित होते.