शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच दीर्घकाळ सुनावणी, खटल्याकडे लागल्या सर्वांच्याच नजरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 01:02 IST

Anvay Naik suicide case: अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा ठपका रायगड पाेलिसांनी अर्णब गाेस्वामी, नितेश सारडा आणि फिराेज शेख यांच्यावर ठेवला आहे.

-   आविष्कार देसाई

रायगड : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गाेस्वामी यांची आठ तास सुनावणी झाली. रायगड जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अशी हाय प्राेफाईल सुनावणी दीर्घकाळ पार पडल्याचे बाेलले जाते. या सुनावणीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या हाेत्या.अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचा ठपका रायगड पाेलिसांनी अर्णब गाेस्वामी, नितेश सारडा आणि फिराेज शेख यांच्यावर ठेवला आहे. पाेलिसांनी तिन्ही आराेपींना बुधवारी न्यायालयात हजर केले. या प्रकरणामध्ये अर्णब गाेस्वामी हे केंद्रबिंदू असल्याने न्यायालयाबाहेर प्रचंड पाेलिसांचा फाैजफाटा बंदाेबस्तासाठी ठेवण्यात आला हाेता. रत्नागिरी आणि पालघर येथून पाेलिसांची जादा कुमक मागविण्यात आली हाेती. त्यामुळे अलिबाग शहराला पाेलीस छावणीचे स्वरूप आले हाेते.अर्णब गाेस्वामी यांच्यासाठी वकिलांची फाैज उभी केली हाेती. दिल्ली, मुंबईमधून व्हीसीच्या माध्यमातून निष्णांत वकील गाेस्वामी यांची बाजू मांडत हाेते. त्यामध्ये ॲड. अबदाद फाेंडा यांचा समावेश हाेता. दाेन्ही बाजूंकडून जाेरदार युक्तिवाद करण्यात आले. सारडा आणि शेख यांची बाजू मांडण्यासाठीही वकील उपस्थित हाेते. त्यामुळे सुनावणी उशिरापर्यंत सुरू हाेती. दाेन टप्प्यांत पार पडलेल्या या सुनावणीमध्ये प्रचंड खडाजंगी झाली. विशेष म्हणजे दुसऱ्या टप्प्यात सुरू झालेली सुनावणी रात्री साडेअकरा वाजता संपली. आराेपींना पाेलीस काेठडी मिळावी यासाठी याआधी इतकी दीर्घकाळ सुनावणी कधी झाल्याचे आठवत नाही. निंबाळकर खून खटल्यातही एवढा वेळ सुनावणी झाली नाही. मात्र गाेस्वामी प्रकरणात न्यायालयाच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतरही निकाल दिल्यावरच कामकाज संपले, असे ज्येष्ठ वकिलांनी सांगितले.

टॅग्स :Anvay Naikअन्वय नाईकarnab goswamiअर्णब गोस्वामी