शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पोलिसांचा ‘बडी कॉप’ ठरतोय देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:08 AM

हरविलेली लहान मुले-मुली, महिलांना मदत : पाच जणांना नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात यश

निखिल म्हात्रे ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : जिल्ह्यातील हरविलेली लहान मुले-मुली, महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नव्याने सुरू केलेला ‘बडी कॉप’ विभाग देवदूत ठरत आहे. डिसेंबर २०१९ पासून सुरू झालेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे हरविलेल्या पाच जणांना त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात यश आले आहे.

रायगड जिल्ह्यात तब्बल २७ पोलीस ठाणे आहेत. त्या ठिकाणी विविध प्रकारचे गुन्हे नोंद होणे सुुरूच असते. संबंधित गुन्ह्यांतील आरोपींना चांगली अद्दल घडावी यासाठी पोलीस त्यांचा शोध घेऊन त्यांना न्यायदेवतेच्या समोर गुडघे टेकायला भाग पाडण्याचे काम करीत असतात. समाजामध्ये कायदा व सुव्यस्था राखण्याचे काम पोलिसांना करावे लागते; त्याचप्रमाणे समाजोपयोगी कामही त्यांच्यामार्फत होत असते. त्यामध्ये प्रामुख्याने हरविलेल्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या घरी नातेवाइकांकडे सुपुर्द करणे अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांना पूर्ण करावी लागते. यातील विशेष बाब म्हणजे हरविलेल्या मुलांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश असल्याने तो विषय अतिशय संवेदनशील पद्धतीने त्यांना हाताळावा लागतो. घरातून पळून जाणारे तसेच लहान मुले हरविण्याच्या तक्रारी वाढत असल्याने रायगड पोलिसांनी ‘बडी कॉप’ हा उपक्रम सुरू केला आहे.

रायगड जिल्ह्यातील गोरेगाव बस स्थानकात १४ वर्षांची मुलगी रडत असल्याची माहिती एसटी नियंत्रकाने संबंधित पोलीस ठाण्यात फोन करून कळविली होती. त्यानंतर ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस हवालदार टेमकर, महिला पोलीस नाईक गोसावी यांनी घटनास्थळी जाऊन त्या मुलीला ताब्यात घेतले. तिच्या समस्या समजावून घेतल्या. पीडित मुलगी जीयांशी पाडेकर हिचे वडील तिला दारू पिऊन मारझोड करीत असत, या रोजच्या त्रासाला कंटाळून ती घरून निघाली. मात्र तिच्या आजोबांच्या गावचे नाव लक्षात नसल्याने ती कावरीबावरी झाली. मात्र, महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला सुव्यवस्थित वडिलांच्या घरी सोडले. तर पेण बाजारपेठेमध्ये पाच वर्षांचा रितेशकुमार महतो हा रडत असल्याने परिसरातील लोक तेथे जमा झाले. त्याची विचारपूस करून ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस हवालदार घरत यांना बोलावून घडलेली परिस्थिती सांगितली. या महिला पोलीस हवालदाराने रितेशकुमार यास त्याच्या वडिलांजवळ पोहोचविले.

महाड तालुक्यातील वीर रेल्वे स्टेशन हद्दीत बडी कॉप महिला पोलीस कर्मचारी जांभरे व कोल्हापुरे गस्त घालत असताना रूपाली सावंत ही आपल्या लहान मुलास घेऊन रडत बसलेली दिसली. तेव्हा चौकशी के ली असता पतीबरोबर वाद झाल्याने घर सोडल्याचे सांगितले. महिला पोलिसांनी तिच्या पतीस घटनास्थळी बोलावून दोघांची समजूत काढत पुन्हा त्यांना एकत्र आणले. तर रस्ता चुकलेल्या ११ वर्षीय अश्विनी मंगेश घाडगे हिला तिच्या आई-वडिलांकडे सोडण्यात यश आले.रेवदंडा येथील हरवलेली महिला सापडलीरेवदंडा येथील सुरेखा वाघमारे खोपोलीला आपल्या बहिणीकडे जाते असे सांगून निघून गेल्या. मात्र चौकशी केली असता त्या खोपोलीमध्ये पोहोेचल्या नसल्याचे नातेवाइकांकडून समजले. त्यानंतर वनिता वाघमारे यांनी आपली वहिनी हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. या तक्रारीवरून बडी कॉप कर्मचारी मोकल व भोईर या गस्त घालत असताना सुरेखा सापडल्या. सुरेखाला त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप पोहोचविण्यात आले.काय आहे बडी कॉप्सया उपक्र मातून पोलीस थेट महिला व मुलींच्या मदतीसाठी जाणार आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यांच्या तक्र ारी नोंदवून घेणार आहेत.तसेच मुलींचे व महिलांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही तयार करण्यात येणार आहेत. त्यातून छेडछाड, लैंगिक गुन्हे कमी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न राहणार आहे. इतकेच नव्हेतर, पोलीस-नागरिक संवादही वाढविण्यात येणार आहे.शहराच्या एखाद्या भागात महिलेवर काही प्रसंग ओढावल्यास ती तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू शकते. ती तक्रार बडी कॉप विभागाकडील पोलीस कर्मचाऱ्यांकडे जाईल. कर्तव्य बजावित असलेल्या महिला पोलीस कर्मचारी पीडितेला मदत करतील. कोणत्याही परिस्थितीत महिलेच्या तक्र ारीचे निवारण करण्याच्या सूचना त्या महिला पोलीस कर्मचाºयांना दिल्या आहेत.- अनिल पारसकर, जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड