आनंदराज घाडगे प्रथम

By Admin | Updated: February 20, 2017 06:19 IST2017-02-20T06:19:45+5:302017-02-20T06:19:45+5:30

शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचालित येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये रामचंद्र

Anandraj Gharge First | आनंदराज घाडगे प्रथम

आनंदराज घाडगे प्रथम

पोलादपूर : शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचालित येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये रामचंद्र धोंडदेव चित्रे स्मृती आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या आनंदराज घाडगे याने प्रथम क्रमांक पटकावला.
दक्षिण रायगड व उत्तर रत्नागिरी या भागातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गेल्या दहा वर्षांपासून सहयोग प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या विशेष सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. वक्तृत्व स्पर्धेच्या प्रारंभी व्यासपीठावरील प्रमुख अतिथी दत्तात्रय काठाळे, सुरेंद्र जाधव, प्राचार्य डॉ. समीर बुटाला व उपप्राचार्य प्रा. सुनील बलखंडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविकामध्ये स्पर्धाप्रमुख प्रा. स्नेहल कांबळे यांनी स्पर्धेसाठी निवडलेल्या विषयांबाबत विवेचन केले. स्पर्धेत आनंदराज घाडगे (डॉ. आंबेडकर महाविद्यालय) याने प्रथम, लक्ष्मण कचरे (सी.जी. मेहता महाविद्यालय, बिरवाडी) याने द्वितीय तर सुंदरराव मोरे महाविद्यालयाच्या सानिका चंद्रकांत शेलार हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
प्राचार्य डॉ. समीर बुटाला यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल सहयोग प्रतिष्ठानचे आभार मानले. प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय काठाळे, माजी केंद्र प्रमुख सुरेंद्र जाधव आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Anandraj Gharge First