शेतात पीकाची कापणी करताना आढळला आठ फूट लांबीचा अजगर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 07:11 PM2023-10-26T19:11:50+5:302023-10-26T19:12:18+5:30

वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सर्पमित्राने अजगराला सोडलं जंगलात

An eight feet long python was found while harvesting crops in the field | शेतात पीकाची कापणी करताना आढळला आठ फूट लांबीचा अजगर

शेतात पीकाची कापणी करताना आढळला आठ फूट लांबीचा अजगर

मधुकर ठाकूर, उरण: चिरनेर -उरण येथे शेतात पीकाची कापणी करताना आठ फूट लांबीचा इंडियन रॉक पायथॉन जातीच्या अजगर आढळून आला. वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे सदस्य सर्पमित्र राजेश पाटील यांनी शिताफीने पकडून त्याला जंगलात सोडून दिले.

चिरनेर -उरण  गावचे रहिवासी असलेल्या हेमंत मोकल यांच्या शेतात गुरुवारी दुपारी भात पिकाच्या कापणीचे काम सुरू होते.कापणी दरम्यान भात पिकात दडून बसलेला अजगर दृष्टीस पडला. हेमंत मोकल यांनी लागलीच सर्पमित्रांना पाचारण केले.सर्पमित्र राजेश पाटील यांना एक आठ फूट लांबीचा इंडियन रॉक पायथॉन जातीचा अजगर शेतात आढळून आला.राजेश पाटील यांनी साडेनऊ फुटी लांबीच्या अजगराला शिताफीने पकडले आणि त्याला नैसर्गिक आवासात सोडून दिले.

Web Title: An eight feet long python was found while harvesting crops in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :snakeसाप