उरण येथील आदिवासींना मासेमारी व्यवसायासाठी बोटींचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 20:48 IST2024-02-07T20:48:22+5:302024-02-07T20:48:37+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून उरण येथील विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील सहा आदिवासींना मासेमारी बोटींचे वाटप करण्यात आले आहे.

उरण येथील आदिवासींना मासेमारी व्यवसायासाठी बोटींचे वाटप
मधुकर ठाकूर
उरण : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून उरण येथील विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील सहा आदिवासींना मासेमारी बोटींचे वाटप करण्यात आले आहे.
उरण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून विविध वाड्यातील आदिवासींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.सामाजिक कार्यकर्त्यांच्या शासनस्तरावरील प्रयत्नांना यश येऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण प्रकल्पाच्या माध्यमातून विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील सहा आदिवासींना मासेमारी व्यवसायासाठी बोटी देण्यासाठी मंजुरी दिली होती.या मच्छीमार बोटींचे बुधवारी आयोजित कार्यक्रमातुन उरण तहसीलदार डॉ.उध्दव कदम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.मासेमारी बोटींचा आदिवासी बांधवांनी उदरनिर्वाहासाठी योग्य प्रकारे वापर करावा असे आवाहन तहसीलदार डॉ उध्दव कदम यांनी या प्रसंगी केले.
याप्रसंगी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सुहास साळसकर,शशिकला अहिरसन सरपंच निसर्गा बाकी, सामाजिक कार्यकर्ते बी.एम.ठाकूर, राजेंद्र मढवी, ज्ञानप्रकाश पाटील, नामदेव ठाकूर, लाभार्थी नितीन कातकरी, देवीदास कातकरी,रवी कातकरी,दिपक कातकरी, सुनील कातकरी,संजय कातकरी यांच्यासह इतर आदिवासी बांधव उपस्थित होते.