अलिबागवर ‘सीसीटीव्ही’ चा वाॅच, ६४ कॅमेऱ्यांचे फुटेज स्क्रिनवर दिसणार

By निखिल म्हात्रे | Published: February 12, 2024 07:55 PM2024-02-12T19:55:11+5:302024-02-12T19:55:20+5:30

या लोकार्पण सोहळ्यास आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व इतर माजी नगरसेवक उपस्थिती होते.

Alibaug's 'CCTV' watch, the footage of 64 cameras will be seen on the screen | अलिबागवर ‘सीसीटीव्ही’ चा वाॅच, ६४ कॅमेऱ्यांचे फुटेज स्क्रिनवर दिसणार

अलिबागवर ‘सीसीटीव्ही’ चा वाॅच, ६४ कॅमेऱ्यांचे फुटेज स्क्रिनवर दिसणार

अलिबाग- जिल्ह्यातील सर्व शहरे सीसीटिव्हीच्या निगरणाखाली आणन्यासाठी जिल्हा नियोजन विभागाकडे खर्चाची मागणी करण्यात येणार आहे. तसेच गुन्हेगारी थोपविण्यासाठी या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची मदत होणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अलिबाग पोलिस ठाण्यातील कार्यक्रमात स्पष्ट केले. तसेच पेण, रोहा, महाड, श्रीवर्धन या तालुक्यात प्रामुख्याने सीसीटिव्ही लावण्यात येणार आहेत.अलिबाग हे पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचे ठरत आहे. त्यामुळे अलिबागमध्ये पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दर आठवड्याला दहा हजारपेक्षा अधिक पर्यटक अलिबागमध्ये येतात. येथील पर्यटन स्थळांचा आनंद घेतात. तसेच वाढत्या नागरिकीकरणामुळे शहराचा विस्तार वाढत आहे. शहरामध्ये वेगवेगळ्या विभागाचे जिल्हा, तालुका कार्यालये आहेत. वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत. याठिकाणी कर्मचारी व विद्यार्थ्यांची वर्दळ असते.

शहरातील नागरिकांच्या व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. जिल्हा नियोजन समितीकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. अखेर या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शहरात 32 ठिकाणी 127 सीसीटिव्ही कॅमेरे बसविले आहेत. शहराच्या प्रवेशद्वारापासून सार्वजनिक ठिकाणी हे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यावर अलिबाग पोलीस ठाणे, वाहतूक शाखा, पोलीस नियंत्रण कक्ष यांचे नियंत्रण राहणार आहे. यामध्ये पूर्णपणे स्केलेबल, अपग्रेड करण्यायोग्य क्लाउड सव्हर आधारित आर्किटेक्चर, भविष्यातील चांगल्या विस्तारासाठी सर्व उद्योग मानक सर्व्हर घटक वापरले जातात, कोणतेही प्रोप्रायटरी हार्डवेअर वापरलेले नाही, उच्च रिझोल्यूशन फॉरेन्सिक अनुकूल BMP आणि 5 MP कॅमेरे वापरले आहेत.

अलिबाग पोलिस ठाण्यात सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असे सीसीटीव्ही सर्व्हेलेंस कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. सदर कंट्रोल रूम मध्ये एकाच वेळी ६४ कॅमेराचे फुटेज पाहता येईल इतक्या मोठ्या आकाराची युएचडी स्क्रीन बसविण्यात आलेली आहे. सर कंट्रोल रूम मध्ये ANPR व FR साठी आवश्यक यंत्रणा बसविणेत आलेली असून सोफ्टवेअरमुळे त्यामुळे अलिबाग शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांची माहिती गोळा करता येणार आहे. तसेच FR प्रणालीमुळे संशयित गुन्हेगारांस शोधण्यास पोलिस दलास मदत होणार आहे.

या लोकार्पण सोहळ्यास आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक व इतर माजी नगरसेवक उपस्थिती होते.

Web Title: Alibaug's 'CCTV' watch, the footage of 64 cameras will be seen on the screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.