शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जिल्ह्यातील कुत्र्यांची होणार निर्बीजीकरण शस्त्रक्रिया; रायगड जिल्हा परिषदेचा पुढाकार

By निखिल म्हात्रे | Updated: March 27, 2024 18:23 IST

२५ लाख रुपयांच्या निधीची

निखिल म्हात्रे,अलिबाग : मोकाट कुत्र्यांच्या चाव्यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरू लागले होते. यावर ठोस उपाय म्हणून रायगड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार अलिबाग तालुक्यातील चेंढरे, थळ व चौलमधील २०७ मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण करण्यात आले. ही मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. श्याम कदम यांनी दिली.

रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. काही वेळा दुचाकीवरून प्रवास करीत असताना कुत्रे अंगावर आल्याने अपघात होण्याची भीतीदेखील असते. मात्र, स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्यावर ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांना, विशेष करून लहान मुलांना दहशतीच्या खाली राहावे लागत आहे.

जानेवारी २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत जिल्ह्यातील चार हजार १७६ जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला होता. यामध्ये एक हजार २०४ जणांना उपचारासाठी दाखल केले आहे. तर, दोन हजार ९७२ जणांवर बाह्य रुग्ण कक्षात उपचार केल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.

कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण हा उपक्रम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेकडून २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. पुणे येथील युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर या एजन्सीला हे काम देण्यात आले आहे.

२५ फेब्रुवारीपासून या कामाला सुरुवात केली आहे. यासाठी पेणमध्ये एक सेंटर उभारण्यात आले आहे. मोकाट कुत्र्यांना पकडणे, त्यांना त्या सेंटरमध्ये आणणे, निर्बीजीकरण, शस्त्रक्रिया करणे व रेबीजपासून बचाव करण्यासाठी श्वान दंश प्रतिबंधित लसीकरण देण्याचे काम सुरू केले आहे.

ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे. त्यासाठी सुरुवातीला अलिबाग तालुक्यातील चेंढरे, चौल व थळ ग्रामपंचायतीची निवड केली आहे. आतापर्यंत २०७ कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आले आहे.

अलिबाग शहरात उपाययोजना -

अलिबाग शहरात ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. पादचाऱ्यांसह दुचाकी चालकांना या कुत्र्यांचा त्रास अनेक वेळा झाला आहे. मोकाट कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, अलिबाग नगर परिषदेमार्फत देखील उपाययोजना करण्यात आली नव्हती. कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यासाठी पाच वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. परंतु, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पुन्हा निविदा मागविण्यात आली होती. पुणे येथील युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर संस्थेची निविदा मंजूर करण्यात आली आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती अलिबाग नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक अंगाई साळुंखे यांनी दिली.

टॅग्स :alibaugअलिबागzpजिल्हा परिषद