अलिबाग लायन्स फेस्टिव्हल

By Admin | Updated: January 14, 2017 06:53 IST2017-01-14T06:53:44+5:302017-01-14T06:53:44+5:30

उद्योगधंद्यासाठी चालना मिळावी व ग्राहकांना या स्पर्धेच्या युगामध्ये वेगवेगळी व अत्याधुनिक उत्पादने खरेदी करता यावीत याकरीता

Alibag Lions Festival | अलिबाग लायन्स फेस्टिव्हल

अलिबाग लायन्स फेस्टिव्हल

अलिबाग : उद्योगधंद्यासाठी चालना मिळावी व ग्राहकांना या स्पर्धेच्या युगामध्ये वेगवेगळी व अत्याधुनिक उत्पादने खरेदी करता यावीत याकरीता लायन्स क्लब तर्फेअलिबाग फेस्टिव्हल २००५ पासून भरविण्यात येतो. यंदा या फेस्टिव्हलचे आयोजन २५ ते २९ जानेवारी या कालावधीमध्ये अलिबाग समुद्रकिनाऱ्या शेजारील मैदानावर करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष नयन कवळे यांनी दिली.
या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारच्या उत्पादनांचे तब्बल १७० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. यामध्ये आरडीसी बॅकेच्या महिला बचत गटांना मोफत स्टॉल उभारण्याची मुभा दिली आहे. २५ जानेवारीपासून पाच दिवसांच्या फेस्टिव्हलमध्ये अनेक रंगबहार कार्यक्र मांचे आयोजित करण्यात आले आहेत. गायक लेस्ली लुईस यांच्या लाईव्ह कार्यक्र माचे आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर स्थानिक कलाकारांचेही रंगतदार कार्यक्रम पाहण्याची मेजवानी रसिकांना मोफत मिळणार आहे.

Web Title: Alibag Lions Festival