शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Oath-Taking Ceremony Live: नरेंद्र मोदी PM पदाच्या हॅटट्रिकसाठी सज्ज; ६९ खासदार घेणार मंत्रिपदाची शपथ
2
"आम्ही वाट पाहायला तयार"; अजित पवारांनी सांगितले मंत्रिपद नाकारण्याचे कारण
3
गुजरात ६, बिहार ८, यूपी ९, महाराष्ट्र...; जाणून घ्या, कोणत्या राज्यातून कुठल्या नेत्याची लागूशकते मंत्रीपदी वर्णी?
4
नारायण राणे, स्मृती इराणी, अन्...; या कॅबिनेटमध्ये दिसणार नाहीत मोदी सरकार 2.0 मधील हे 20 दिग्गज चेहरे?
5
राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या एकही मंत्रिपद का नाही? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं कारण
6
एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी
7
व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
8
HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग
9
'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी
10
Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान
11
'2047 पर्यंत भारत विकसित देश बनणार...' शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींची संभाव्य मंत्र्यांसोबत बैठक
12
'तारक मेहता..'मधली नवी 'सोनू' बोल्डनेसमध्ये भिडे मास्तरांच्या जुन्या सोनूलाही देतेय टक्कर
13
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची संभाव्य तारीख आली समोर! पण, मोदी सरकारमुळे पाकिस्तानची कोंडी 
14
"सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेलांना"; मंत्रिपदावरुन अजितदादांबाबत रोहित पवारांचा मोठा दावा
15
पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी, ऊसतोड कामगार युवकाने संपवले जीवन
16
Sunita Rajwar : "मी खूप संघर्ष केला, आई-वडिलांनी..."; ट्रक ड्रायव्हरची मुलगी बनली लोकप्रिय अभिनेत्री
17
जंक फूड, प्रोसेस्ड फूड खायला आवडतं? आताच थांबा; कॅन्सरसह 'या' आजारांचा मोठा धोका
18
Jayant Patil : "समुद्र नाही याची पुणेकरांना खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला"
19
VIDEO: मुंबई विमानतळावर वाचला शेकडो प्रवाशांचा जीव! थोडक्यात टळली दोन विमानांची धडक
20
"हँडसम आफ्रिदी...", नवज्योतसिंग सिद्धू आणि माजी पाकिस्तानी खेळाडूचा संवाद Viral

सुनेत्रा पवार यांनी घेतली अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट

By राजेश भोस्तेकर | Published: March 29, 2024 1:58 PM

शिवतारे यांची पूर्ण ताकद सुनेत्रा पवार यांच्या मागेच, निलेश लंके यांना लोकसभेची पडत आहेत स्वप्न, नाशिकची जागा मिळाल्यावर सविस्तर बोलेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : बारामती मध्ये शिवतारे यांची ताकद सुनेत्रा पवार यांच्या मागे शंभर टक्के उभी राहणार आहे. विजय शिवतारे यांच्या मनातील शंका कुशंका ह्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दूर केल्या आहेत. त्यामुळे शिवतारे हे सुनेत्रा पवार यांच्या बाजूने प्रचार करतील. निलेश लंके याना लोकसभेची स्वप्न पडू लागली आहेत. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असून यासाठी त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल अन्यथा पक्षांतर बंदी कायद्याने त्यांच्यावर कारवाई करू अशी प्रतिक्रिया रायगड लोकसभेचे उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. नाशिक येथील जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्यानंतर तेथील परिस्थितीवर बोलेल असेही तटकरे म्हणाले आहेत. 

बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी रेवदंडा येथे अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. सुनील तटकरे यांनाही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रेवदंडा येथे पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांची त्याच्या निवासस्थानी येऊन भेट घेतली. यावेळी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. 

नाशिक, बारामती, अहमदनगर लोकसभा मतदार संघातील राजकीय परिस्थितीबाबत सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी समर्पक उत्तरे दिली. बारामती लोकसभा मतदार संघात आमदार विजय शिवतारे यांचे बंड शमले असले तरी प्रचारात उतरले नसल्याबाबत तटकरे यांना विचारले असता, कालच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली आहे. शिवतारे यांच्या मनातील असलेल्या शंका कुशंका यांचे निरसन करण्यात आले आहे. त्यामुळे एक दोन दिवसात ते प्रचारात उतरून त्यांची संपूर्ण ताकद सुनेत्रा पवार यांच्या मागे लावतील असा विश्वास तटकरे यांनी बोलून दाखवला आहे. निलेश लंकेना लोकसभेचे वेध

निलेश लंके याना लोकसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभेचे स्वप्न पडत असल्याने त्यांनी निर्णय घेतला असेल. सात आठ महिन्यात अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला त्यांची सहमती होती. त्याच्या मतदार संघात हजारो कोटीची विकासकामे झाली आहेत. लंके याना विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल अन्यथा त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्याने कारवाई करू. अहमदनगर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने उभी आहे अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 

उमेदवारी जाहीर झाल्यावर सविस्तर बोलणार

नाशिक लोकसभा मतदार संघात छगन भुजबळ यांना स्वपक्षातून आणि मनोज जरांगे यांचा विरोध आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाशिक जागेबाबत दोन दिवसात निर्णय होईल. वेगवेगळ्या प्रतिक्रिया असू शकतात जागा वाटप झाल्यावर सखोल बोलेले. छगन भुजबळ हे गेली चाळीस, पन्नास वर्ष राजकारणातील महत्वाचे नेते आहेत. मंडल कमिशन अंमल बजावणी साठी त्यांचा मोठा संघर्ष आहे. ओबीसी न्याय हक्कासाठी  राज्यासह देशभरात लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. नाशिक ची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तर त्यावर तपशील वार बोलेल असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारsunil tatkareसुनील तटकरे