शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड येथे ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियान

By admin | Updated: May 8, 2017 06:19 IST

मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेली, ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कोकणाला मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमुरु ड जंजिरा : मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेली, ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कोकणाला मिळालीच पाहिजे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी कोकणातील माणूस या योजनांचा पुरेसा लाभ घेत नाही, अशी खंत आमदार सुभाष पाटील यांनी व्यक्त केली.मुरु ड व अलिबाग तालुका कृषीविभाग व पंचायत समिती यांचे संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम २०१७ नियोजन सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना राबवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी कृषी अधिकाऱ्यांनी सोडविण्याचे आवाहन त्यांनी केले.मुरु ड तालुक्यातील मिठागर,खामदे येथील पाणीटंचाईच्या संदर्भात तालुका गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचे निर्देश त्यांनी दिले. भारत निर्माण योजनेतून ३ वर्षांत १०० कोटींची मागणी असताना जिल्हानियोजन मंडळाने केवळ १० कोटी निधी मिळाल्यामुळे पाणीपुरवठा योजना रखडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. योजनेंतर्गत पुरवणी निधीला शासनाने मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. कृषी विभागाने गांभीर्याने शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब शेतकऱ्यांना देण्याचे संकेत दिले. या प्रसंगी व्यासपीठावर आम. सुभाष पाटील, रायगड जि.प. उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, मुरुड तालुका शेकाप चिटणीस मनोज भगत, जि.प. सदस्या नम्रता कासार, मुरुडतालुुका पं.स.उपसभापती प्रणिता पाटील, मोतीराम पाटील, विजय गिदी, मुरु ड गटविकास अधिकारी एस.यू. चव्हाण, अलिबाग गटविकास अधिकारी संदीप प्रधान,तालुकाकृषीअधिकारीबी.आर. जानुगडे, तालुका कृषीअधिकारी श्याम धर्माधिकारी,बाबू नागावकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक करताना कृषी अधिकारी श्याम धर्माधिकारी व बी.आर.जुनागडे यांनी अनुक्र मे मुरु ड व अलिबाग तालुक्याची भौगोलिक क्षेत्राची माहिती, लागवड क्षेत्र, सरासरी पर्जन्य आदीचा आढावा घेत ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियान खरीप २०१७ चा संकल्प पूर्तीसाठी पीक प्रात्याक्षिके, कृषी यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन, शेतकरी प्रशिक्षण व सहली, भात बियाणे, तसेच रासायनिक खतांची मागणी आदींचे लक्षांक स्पष्ट केले. सभेस रायगड जिल्हापरिषद उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी लागवड क्षेत्र वाढीस लागण्यासाठी तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी उपाययोजना शोधून शेती लागवडीसाठी प्रवृत्त केल्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २०२०चे स्वप्न पूर्ण होणार नाही, याकडे लक्ष वेधले. नियोजन सभा वर्षातून किमान दोन व्हाव्यात, अशा सूचना आधिकाऱ्यांना दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.यू.चव्हाण यांनी, तर आभार प्रदर्शन सुनील प्रधान यांनी केले.तळ्यात जनजागृतीतळा तालुक्यात ‘‘उन्नत शेती - समृध्द शेतकरी अभियान अंतर्गत १५ मे पर्यंत कृषी जनजागृती पंधरवडाचे आयोजन तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतील समाविष्ठ गावांत करण्यात आले आहे. कृषि जनजागृती पंधरवडा दरम्यान कृषि विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी प्रत्येक गावात सभेचे आयोजन करुन शेतकऱ्यांना भात किंवा प्रक्रिया प्रात्याशिक, भात उगवण क्षमता प्रात्याक्षिक आदींवर मार्गदर्शन करण्यात आले.