अद्वैत वाकणकर राज्यात पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 01:24 IST2018-01-16T01:24:50+5:302018-01-16T01:24:50+5:30

लोणेरे-माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेचा विद्यार्थी अद्वैत किरण वाकणकर याने ९७.५ टक्के गुण मिळवित विद्यापीठाच्या

 Advaita Wakankar is the first in the state | अद्वैत वाकणकर राज्यात पहिला

अद्वैत वाकणकर राज्यात पहिला

बोर्ली पंचतन : लोणेरे-माणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेचा विद्यार्थी अद्वैत किरण वाकणकर याने ९७.५ टक्के गुण मिळवित विद्यापीठाच्या ई ग्रुपमध्ये राज्यामध्ये पहिला तर इतर सर्व शाखांमधून राज्यामध्ये दुसरा येण्याचा बहुमान मिळविला आहे. नुकत्याच लोणेरे येथे झालेल्या २१ व्या पदवीदान दीक्षांत समारंभप्रसंगी अद्वैतला भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईचे संचालक प्राध्यापक देवांग खरखर यांच्या हस्ते सुवर्ण पदक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. अद्वैत वाकणकर हा मूळचा श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वरचा रहिवासी आहे.

Web Title:  Advaita Wakankar is the first in the state