आदेश बांदेकर यांची 'माथेरान पर्यटन राजदूत' म्हणून निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 00:14 IST2021-02-27T00:14:17+5:302021-02-27T00:14:28+5:30
नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते आदेश बांदेकर यांना माथेरान पर्यटन राजदूत निवडीचे पत्र देण्यात आले.

आदेश बांदेकर यांची 'माथेरान पर्यटन राजदूत' म्हणून निवड
माथेरान : गिरिस्थान नगरपालिकेत शुक्रवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत दिग्दर्शक, रायगड जिल्हा माजी संपर्कप्रमुख आदेश बांदेकर यांची माथेरान पर्यटन वाढीसाठी ‘माथेरानचे पर्यटन राजदूत’ म्हणून निवड केली आहे. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या हस्ते आदेश बांदेकर यांना माथेरान पर्यटन राजदूत निवडीचे पत्र देण्यात आले.