खालापूर तालुक्यात दोन गटांत हाणामारी

By Admin | Updated: February 17, 2017 02:12 IST2017-02-17T02:12:46+5:302017-02-17T02:12:46+5:30

घरासमोरील मोकळ्या जागेच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्र ार दिल्यानंतर

Action in two groups in Khalapur taluka | खालापूर तालुक्यात दोन गटांत हाणामारी

खालापूर तालुक्यात दोन गटांत हाणामारी

वावोशी : घरासमोरील मोकळ्या जागेच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्र ार दिल्यानंतर पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे.
खालापूर हद्दीतील चौकनजीक जांभिवली बौद्धवाडा येथे राहणारे सुशील विष्णू कांबळे हे मंगळवारी रात्री दहा वाजता दुचाकीवरून चौक येथून घरी जात असताना गावातील प्रशांत सावंत, सत्यवान सावंत, संतोष सावंत रस्त्यावर उभे होते. त्यावेळी सुशील कांबळे यांनी रस्त्यातून बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवला.परंतु तिघेही रस्त्यातून बाजूला झाले नाही. म्हणून सुशील याने दुचाकी रेस केली. या गोष्टीचा राग येवून प्रशांत सावंत, संतोष सावंत, सत्यवान सावंत, अशोक सावंत, राजेंद्र सावंत, मंगेश सावंत, अरविंद सावंत, बाळाराम सावंत, शारदा सावंत, संगीता सावंत या सर्वांनी सुशील कांबळेला मारहाण केली.
तर दुसऱ्या गटातील संतोष सावंत याने पोलिसात दिलेल्या तक्र ारीनुसार मंगळवारी रात्री संतोष मित्रासमवेत उभा असताना सुशील कांबळे यांनी वेगात दुचाकी आणून संतोष सावंतला धक्का मारून खाली पाडले. या गोष्टीचा जाब विचारला म्हणून मारहाण
केल्याचे म्हटले आहे . (वार्ताहर)

Web Title: Action in two groups in Khalapur taluka